नैसर्गिक संकटे शेतकर्यांचा पिच्छा सोडेना
शेख फारुक गिरगावकर
आखाडा बाळापूर (Heavy rain) : कळमनुरी तालुक्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामासाठी हंगामपुर्व शेती मशागत कामे आटोपून शेतकरी पेरणीसाठी पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा करत आसताना सोमवारी सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत कळमनुरी तालुक्यातील विविध भागात वादळी वार्यासह मुसळधार पावस झाला यात वादळामुळे केळीबागा,पपई बागा,उस,आंबा, बरोबर इतर पिकांच आतोनात नुकसान झाले तसेच शेतातील आखाडे उध्वस्त झाले तर गावागावात घरावरील पत्रे उडून गेली याचप्रमाणे शेतशिवारात व गाव शिवारात वार्यामुळे अनेक ठिकाणी विजखांब पडले, विजतार तुटून पडल्या यामुळे सोमवारी रात्रभर साठ सत्तर गाव अंधारात होती मंगळवारी दुपारपर्यंत विजपुरवठा सुरू झाला नव्हता विजकंपनी अधिकारी कर्मचारी पथक तांत्रिक कामे करून विजपुरवठा सुरू करण्यासाठी धडपड करत होते.
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, शेवाळा, देवजना, कवडी, कान्हेगाव, आडा, पिंपरी, चिखली, फुटाणा, जवळा पांचाळ, डोंगरकडा, दांडेगाव, रामेश्वर वरूड, हिवरा, वसफळ, सुकळी वीर, तोंडापूर, वारंगा फाटा, वाकोडी, गांगापुर,डोंगरगाव नाका, भोसी, कुर्तडी, दात्ती, कांडली, रूद्रवाडी, चुंचा, रेडगाव, वडगाव, डीग्रस व इतर भागात सोमवारी सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत अचानक वादळी वारे सुटले वादळी वार्यांचा वेग प्रचंड मोठ्या प्रमाणात होता वादळी वार्यामुळे बागायती पट्टा असलेल्या जवळापांचाळ, रेडगाव, वडगाव, वसफळ, दांडेगाव,डोंगरकडा, भाटेगाव, डीग्रस,सुकळीवीर, जामगव्हाण व इतर भागात केळीचे शेकडो झाडे पडून लाखो रूपयाचे नुकसान झाले.
दांडेगाव भागात केळी नुकसान बरोबर शेतातील आखाडे उध्वस्त झाले आसल्याच शेतकरी कैलास पाटील सांळुखे यांनी सांगितले तर चक्रीवादळामुळे कवडी शेतकरी मुंकुदराव पतंगे यांनी नर्सरी करता चार दिवसापूर्वी शंभर बाय शंभर उभारलेले शेडनेट पुर्णपणे जमीनदोस्त झाले तसेच मुंकुदराव पतंगे यांचे तीन एकर व शिवाजी नानाराव कदम यांचे तीन एकर पपई पिक पुर्णपणे जमीनदोस्त झाले असल्याचे दयानंद पतंगे यांनी सांगितले. याचबरोबर घरावरील पत्रे उडाली झाडे जागोजागी पडली. तर चिखली शेतशिवारात वारा व पावसामुळे सुमनबाई माणिकराव चव्हाण, यांच्या शेतातील साडेसात एचपीचे सोलर उडून गेले तसेच शिवारात गावात अनेक पत्रे उडाली, आखाडे नुकसान झाले असल्याचे अमोल चव्हाण व संदीप चव्हाण यांनी सांगितले.
तालुक्यातील विविध भागात शेतकर्यांनी बसवलेले सोलरपंप उडाले, तुटून नुकसान झाले तसेच शेतातील साधे आखाडे व पत्राच्या आखाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतशिवारात मोठमोठी झाडे तुटून पडली. पोलीस स्थानकात अधिकारी निवासस्थानी असलेले मोठे जुने झाड रात्री पडले. संध्याकाळ पासून रात्री उशिरापर्यंत वार्याचा धुमाकूळ सुरू होता यात अनेक गावात घर,शेतातील उडालेली पत्रे नागरिक शोध घेत होते.
उपविभागीय अधिकारी भुते व तहसीलदार कांबळे यांनी नुकसानीची केली पाहणी : कळमनुरी तालुक्यात सोमवारी सायंकाळी व रात्री चक्रीवादळामुळे व मुसळधार पावसाने बागायती पिके व इतर पिके, शेडनेट, सोलर व शेती साहित्याच आतोनात नुकसान झाले. मंगळवारी कळमनुरी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार जिवककुमार कांबळे, पथकाने कवडी, शेवाळा, डोंगरकडा, जवळापांचाळ बरोबर विविध शेतशिवारात भेट देऊन नुकसान पाहणी केली शेतकर्यांशी संवाद साधून नुकसान माहिती घेतली. यावेळी मंडळ अधिकारी आनंदराव काकडे, पी.एस.चव्हाण, तलाठी विशाल पतंगे, संतोष शेवाळकर, गोविंद भोरगे, विविध सज्जा तलाठी सह शेतकरी, पोलीस पाटील उपस्थित होते.
यावेळी विविध भागातील शेतकर्यांनी अधिकारी कर्मचारी पथकाला केळी, पपई, उस,शेडनेट, सोलार,आखाडा, शेती साहित्य नुकसान माहिती देऊन अतोनात नुकसान झाले आहे शासनाकडून नुकसान तुलनेत नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी शेतकर्यांनी केली.
नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करा – आ. संतोष बांगर
कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव नाका, वाकोडी, गांगापूर आदी ठिकाणी वादळी वार्यासह मोठे नुकसान झाले असुन जनावरांनाही मार लागला आहे. तसेच काही ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने तात्काळ मदत कार्यासाठी पथके पाठविण्याबाबत आ. संतोष बांगर यांनी तहसिलदार जीवककुमार कांबळे यांना सूचना दिल्या. प्रत्येक भागात महसुलचे पथके पाठवावे, तसेच ज्या ठिकाणी जिवीत हाणी झाली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या यंत्रणेला ही आ. बांगर यांनी मदतीसाठी सूचना केल्या.
रात्रभर वीजपुरवठा पडला बंद
सोमवारी सायंकाळी सुटलेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यातील विविध शिवारात मोठ्या प्रमाणात विजेची खांब पडली तसेच विद्युत तारा तुटल्याने सोमवारी रात्रभर जवळपास साठ सत्तर गावात व शेतशिवारात वीजपुरवठा बंद पडला मंगळवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरु झाला नव्हता वीजकंपनी अधिकारी कर्मचारी तांत्रिक कामे करून विजपुरवठा सुरळीतपणे चालू करण्यासाठी धडपड करत होते.
नुकसान पाहणी
दरम्यान तालुक्यातील बागायती पट्टा बरोबर इतर शेतशिवारात चक्रीवादळामुळे केळीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचबरोबर पपई, उस, भाजीपाला पिक, आखाडे,घराच नुकसान झाले शासनाने नुकसान पाहणी करून शेतकर्यांना मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. यापूर्वी डोंगरकडा इतर पट्ट्यात बागायती पिकांचे नुकसान झाले होते परंतु आश्वासन शिवाय शेतकर्यांच्या पदरी काही पडले नाही आतातरी नुकसान भरपाई मिळण्याची नितांत आवश्यकता आहे. पिकविमा कंपनीच्या वतीने पाहणी करून नुकसान भरपाई देण्यासाठी पावले उचलली पाहिजे आस नुकसान झालेल्या शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.