सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा करू नये : आ. देशमुख
लातूर (Heavy Rain) : अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्याला तीन ते चार हजार कोटींचा फटका बसल्याचा दावा माजी मंत्री तथा काँग्रेसचे प्रतोद आमदार अमित देशमुख यांनी केला. असे असतानाही सरकारकडे (Govt) ओला दुष्काळ हा शब्दच नाही, अशी टीका करीत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा करू नये, असा इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांसाठी शासनाने जलद गतीने ओला दुष्काळ जाहीर करायला हवा!
लातूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार देशमुख म्हणाले की अतिवृष्टी झाल्यापासून सरकारचे आश्वासक वक्तव्य आलेले दिसत नाही. अतिवृष्टीमुळे पिके, रस्ते, पूल, विजेच्या तारा, जनावरे, शेतकऱ्यांचे (Farmers) साहित्य इतकेच नव्हे तर मातीही वाहून गेली. शेतकऱ्यांसाठी शासनाने जलद गतीने ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता. मात्र सरकारकडे ‘ओला दुष्काळ’शब्दच नाही. शासनाने शेतकऱ्यांची चेष्टा करू नये, शेतकऱ्यांचा अनादर करू नये असा इशारा त्यांनी दिला. सरकारने ठरवले तर हेक्टरी 50 हजारांची मदत सरकार करू शकते. मात्र शासन किती गंभीर आहे हे यावरून दिसून येते, असेही आमदार देशमुख म्हणाले.