8 ऑक्टोबर रोजी मनोऱ्यात मोर्चा!
मानोरा (Heavy Rain) : मानोरा तालुका ओला दुष्काळ (Drought) जाहीर करून अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना शासनाची सरसकट आर्थिक मदत दिवाळी पुर्वी द्यावी. या मागणीसाठी शासनाचे (Government) लक्ष वेधण्यासाठी बुधवार दि. ८ ऑक्टोबर रोजी खा. संजय देशमुख यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर (Tehsil Office) तालुका शेतकरी, शेतमजूर मंचच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माजी आ. अनंतकुमार पाटील यांनी दिली.
पत्रकात परिषद मधे माहिती!
यावर्षीच्या खरीप हंगामात गेल्या दोन महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे उडीद, मुंग, सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिके पाण्याखाली येऊन उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच अती पावसाने फळबाग, भाजीपाला पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तुटपुंजी आर्थिक मदत जाहीर केली आहे. हेक्टरी ५० हजार रुपये व पिक कर्ज माफ करावे, सरसकट शेतकऱ्यांना (Farmers) पिक विमा द्यावा. या मागणी साठी हा मोर्चा निघणार आहे.
सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पंजाबच्या धर्तीवर अनुदान देण्यात यावे!
पत्रकार परिषदेला माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, युवा नेते ॲड ज्ञायक पाटणी, बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोठे, व . ना. तांडा सुधार योजनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश राठोड, सरपंच उमेश राठोड, उध्दव सेनेचे तालुका प्रमुख रविंद्र पवार, प्रगतशील शेतकरी प्रेमसिंग नाईक, महंत रमेश महाराज, माजी प स सदस्य मधुसूदन राठोड, अभयखेडा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर चौधरी, माजी प स सदस्य अशोक चव्हाण, बाजार समितीचे संचालक सुनील जामदार, माजी सरपंच महेश पाटील, इफ्तेखार पटेल, माजी सरपंच विजय पाटील, प्रकाश राठोड, माजी प स सभापती भावसिंग राठोड, निळकंठ पाटील, महेश राठोड, रोशन चव्हाण, शाम राठोड, महादेव पांडे, अमोल शर्मा मानोरा तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर अडचणी आहे. सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पंजाबच्या धर्तीवर अनुदान देण्यात यावे. आता सरकारने शेतकरी, शेतमजुराचा अंत पाहू नये, तसेच घराला कुलूप लावून मोर्चात सहभागी व्हावे, राज्यांच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यासाठ 1 महिन्याचा पेन्शन देणार असल्याचे माजी आ. अनंतकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.