कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ!
बासंबा (Heavy Rain) : हिंगोली तालुक्यातील बासंबा परिसरात 4 दिवसापासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सोयाबीन पिकाबरोबर अन्य पिकांनाही मोठा धोका उत्पन्न झाला आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग हालाखीचे जीवन जगत आहे. यावर्षी तर ऑगस्ट महिना अर्ध्यावर आल्यानंतर, पावसाने उसंती दिल्याने मागील 4 दिवसापासून ढगफुटी दृश्य पाऊस बरसत असल्याने शेतकर्यांची पूर्ण शेती पाण्याखाली गेली असून, सध्या शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकासह तूर, मुग, हळद इतर पिके उध्वस्त झाल्याने अनेक वर्षापासून शेतकरी वर्गावर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट कोसळत आहे.
अनेक भागात गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान!
मागील चार-पाच वर्षांपासून शेतकरी वर्ग अतोनात खर्च करून पिकाला भाव मिळत असल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडला असून, अनेक भागात गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ते नुकसान भरून काढण्यासाठी यावर्षी शेतकर्यांनी आपल्या शेतात सोयाबीन, हळद, कापूस, तूर, उडीद, मूग व विविध भाजीपाला तसेच फळ बागांची लागवड केली आहे. जून पासून अत्यल्प पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकर्यांनी (Farmers) शेतातील विहिरी व बोरवेलवर विद्युत पंपाच्या (Electric Pump) साह्याने पिके वाचवण्याचा प्रयत्न केला. जवळपास अर्धा पावसाळा संपून अर्ध्यावर ऑगस्ट महिना आला असता, पुन्हा शेतकर्यावर अस्मानी संकट कोसळले असून, गेल्या 8 दिवसापासून मुसळधार सदृश्य पाऊस पडत असल्यामुळे अनेक शेतकर्यांच्या शेतातील कामे घोळवली असून नदी व ओढ्याकाठील शेतात पावसाचे पाणी साचल्यामुळे पीक परिस्थिती धोक्यात आली आहे. शासन (Government) दरबारी नुकसान भरपाई मागण्यासाठी शेतकरी वर्ग आता कोणाकडे हात पसरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.