बारा दिवस फरार असताना परळीच्या कराडने आश्रय दिल्याची चर्चा
परभणी (Hendge murder case) : हेंडगे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी प्रभाकर चव्हाण, रत्नमाला चव्हाण (Chavan Family) या दांम्पत्याला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर बारा दिवस चव्हाण दांम्पत्य फरार होते. या (Hendge murder case) दांम्पत्याला परळीच्या कराड नावाच्या व्यक्तीने आश्रय दिल्याची चर्चा आहे. हा कराड नेमका कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुलीची टि.सी. काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक प्रभाकर चव्हाण, त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण (Chavan Family) यांनी मारहाण केली. यात पालकाचा मृत्यू झाला. पूर्णा पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल होताच प्रभाकर चव्हाण, रत्नमाला चव्हाण फरार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध घेत मंगळवार २२ जुलै रोजी संबंधीतांना पुणे येथून ताब्यात घेतले. (Hendge murder case) गुन्हा दाखल झाल्यानंतर बारा दिवस फरार असलेल्या चव्हाण दांम्पत्याला परळीच्या कराड नावाच्या व्यक्तीने आश्रय दिल्याची चर्चा होत आहे.
नेमका हा कराड कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या (Hendge murder case) प्रकरणात पोलिसांकडून चांगला तपास सुरु आहे. मात्र फरार असलेल्या बारा दिवसात चव्हाण दांम्पत्य नेमके कोठे कोठे गेले? त्यांना कोणी कोणी आश्रय दिला? या विषयी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिलेली नाही. चव्हाण दांम्पत्याला आश्रय देणार्यांनाही सदर प्रकरणात आरोपी करावे अशी मागणी जोर धरत आहे.