देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Assembly Election: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत: जिल्हाधिकारी अभिनव गोयल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Assembly Election: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत: जिल्हाधिकारी अभिनव गोयल
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Assembly Election: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत: जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/10 at 5:16 PM
By Deshonnati Digital Published November 10, 2024
Share
Hingoli Assembly Election

हिंगोली विधानसभा मतदारसंघात स्वीप कार्यक्रमाने सुरुवात

हिंगोली (Hingoli Assembly Election) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वीपच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी केले. येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित मतदार जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाचे (Hingoli Assembly Election) निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी प्रशांत दिग्रसकर, डायट प्राचार्य दिपक साबळे, ज्येष्ठ अधिव्याख्याता अमोल निळेकर, स्वीप नोडल अधिकारी नितीन नेटके उपस्थित होते. मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्राकडे वळवून मतानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभाग प्रयत्न करत आहे. याकामी मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. सर्वांनी आपापल्या प्रयत्नातून प्रत्येक व्यक्ती मतदान करेल, यासाठी प्रयत्नशील राहून मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन  गोयल यांनी केले.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या (Hingoli Assembly Election) अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वीपच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. स्वीप अंतर्गत दिनांक 8 ते 19 नोव्हेंबर 2024 दरम्यान घ्यावयाच्या उपक्रमामध्ये मतदार शपथ, निवडणूक गीत, रांगोळी, पथनाट्य, मतदान जनागृतीविषयक चित्रकला, पोस्टर स्पर्धा, मानवी साखळी, संकल्प पत्र, मॅरेथॉन, पायी रॅली, सायकल मोटार तथा मोटर सायकल रॅली व घरोघरी प्रत्यक्ष भेट या उपक्रमाचा समावेश केला गेला आहे.

शाहीर प्रकाश दांडेकर व इतर कलावंत यांच्याद्वारे कार्यक्रमाची सुरुवात मतदान जागृती गीताने झाली. जिल्हा स्वीप नोडल अधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी आपल्या प्रास्ताविकेमधून स्वीप अंतर्गत झालेल्या उपक्रमाचा व येत्या काही दिवसात होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा स्पष्ट केला. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वाक्षरी मोहिमे अंतर्गत मी मतदान करणारच.! अशा आशयाच्या बोर्डवर स्वाक्षऱ्या करून 100 टक्के मतदान करण्याचा निर्धार केला.

विधानसभा निवडणुकीत (Hingoli Assembly Election) निःपक्षपणाने, कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब न करता, शांततापूर्ण वातावरणात, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्यासंदर्भात उपस्थित सर्वांनी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीप सदस्य राजकुमार मोरगे यांनी केले तर आभार स्वीप नोडल अधिकारी नितीन नेटके यांनी मानले. कार्यक्रमासाठी तालुका आयकॉन एम. एम. राऊत, स्वीप सदस्य विनोद चव्हाण, संजय मेथेकर, शाम स्वामी, विजय बांगर, बालाजी काळे, दिपक कोकरे, राजकुमार मोरगे तसेच मोठ्या प्रमाणावर मतदार उपस्थित होते.

You Might Also Like

Schemes: ऐन दिवाळी तोंडावर विविध योजना जवळपास 25 हजार लाभार्थी आले 80 कोटीवर अनुदान!

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

Parbhani Accident: परभणीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, दोन जण गंभीर जखमी!

Nationalist Congress: महाराष्ट्रात आज तहाच अन् तडजोडीच राजकारण सुरू!

Youth Death: ट्रॅक्टर अंगावर पडून युवक ठार; एक गंभीर जखमी!

TAGGED: Collector Abhinav Goyal, Hingoli Assembly election
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतपरभणीमराठवाडा

Parbhani accident: उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Deshonnati Digital Deshonnati Digital June 13, 2024
Prof. Kabaddi Tournament: कबड्डी पटू आकाश चव्हाण यांचा समाज बांधवातर्फे सत्कार
Kartavya Bhawan Inauguration: पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘कर्तव्य भवन-3’ चे उद्घाटन संपन्न! 
Illegal sand mining: रात्रीच्या वेळी अवैध वाळूचे उत्खनन करणाऱ्यांना श्रेय कोणाचे..!
Nanded Municipal Corporation: नांदेड शहरात उद्भवलेल्या पुर परिस्थितीत महापालिकेने केल्या उपाययोजना!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Schemes
हिंगोलीमराठवाडा

Schemes: ऐन दिवाळी तोंडावर विविध योजना जवळपास 25 हजार लाभार्थी आले 80 कोटीवर अनुदान!

October 19, 2025
Pollution-Free Diwali
मराठवाडाहिंगोली

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

October 19, 2025
Parbhani Accident
मराठवाडापरभणी

Parbhani Accident: परभणीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, दोन जण गंभीर जखमी!

October 19, 2025
Nationalist Congress
मराठवाडाहिंगोली

Nationalist Congress: महाराष्ट्रात आज तहाच अन् तडजोडीच राजकारण सुरू!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?