हिंगोली (Hingoli Collector Abhinav Goyal) : हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी धुळे येथील जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे आदेश बुधवारी २८ ऑगस्टला काढण्यात आले आहेत. हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची ८ ऑगस्ट रोजी धुळे येथे बदली झाल्यानंतर हिंगोलीचा पदभार अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या कडे होता. त्यानंतर हिंगोलीत नवीन जिल्हाधिकारी पदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आज शासनाने (Hingoli Collector Abhinav Goyal) अभिनव गोयल यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.
जिल्हाधिकारी गोयल मूळचे मेरठ (उत्तर प्रदेश) येथील आहेत. त्यांनी यांनी आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. सन २०१५ च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी नांदेड व लातूर जिल्ह्यात काम केले आहे. किनवट (जि. नांदेड) येथे २०१८ ला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांची लातूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली होती.
नांदेड व लातूर जिल्ह्यात त्यांनी आपल्या कर्तुत्वाची छाप उमटवली. या कार्यकाळात त्यांनी यांनी आदिवासी आश्रमशाळांचा कायपालट करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय जनतेचे प्रश्न मार्गी लावून विविध योजनाही राबविल्या. त्यानंतर त्यांची धुळे येथील जिल्हाधिकारी पदी निवड झाली होती. (Hingoli Collector Abhinav Goyal) जिल्हाधिकारी पदी गोयल यांची नियुक्ती झाल्याने आता प्रशासनातील मुख्य रिक्त पदाचा प्रश्न दूर झाला आहे.