कळमनुरी/ कळमनुरी (Hingoli):- शहरातील एसबीआई (SBI)बैंकच्या समोरुन नाल्याचे घाणेरडे पाणी रस्त्यावरून वाहत आहे पालिकेकडून हा नाला नियमितपणे व्यवस्थित साफ न झाल्यामुळे सदर नाला ओसंडून वाहत होते याबाबत दैनिक देशोन्नती (Dainik Deshonnati)मध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला जाग आली व यानंतर नगरपालिका प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने एसबीआय बँके समोरील नाल्यांची सफाई करण्यास सुरुवात केली.
लवकरच शहरातील स्वच्छता मोहीम राबवून शहर स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती
शहरातील जवळच असलेल्या जुना बसस्टॉप व, शाळा महाविद्यालय वरील प्रवासी, विद्यार्थी व स्थानिक नागरिक, रस्त्यावरून वाहणाऱ्या नाल्याच्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले व नाक बंद करूनच तेथून प्रवास करावा लागत होता. याबाबतच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला जाग आली व नगरपालिका प्रशासनाने त्वरित जेसीबीच्या साह्याने सदरच्या रस्त्यावरील नाल्यांचे सफाई करण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेने सदर नाल्याची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतल्याने येथील स्थानिक नागरिकांतून पालिका प्रशासनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केल्या जात आहे. लवकरच शहरातील स्वच्छता मोहीम राबवून शहर स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिका मुख्याधिकारी रविराज दरक व आनंद दायमा यांनी दिली.