हिंगोली(hingoli):- शहराजवळील बळसोंड भागातील अंतुले नगरात एका वृद्ध महिलेला(old lady) चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने चोरून नेणार्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.
सोन्याची पोत जबरीने चोरून नेणार्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद
या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास पोउपनि विक्रम विठूबोणे यांच्यासह पथकाने केला. तेलंगणा राज्यातील निजामबाद येथील अलताफ उर्फ साजीद अहेमद शेख याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर हिंगोली बसस्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर अंतुलेनगर बळसोंड भागातील वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची पोत तोडून मोटारसायकलवर(Motorcycle) पळून गेल्याची कबुली त्याने दिली. या गुन्ह्यातील ३५ हजाराचे ११ ग्रॅमचे सोन्याचे सेवनपीस व गुन्ह्यात वापरलेली ७० हजार रूपयाची मोटारसायकल असा एकूण १ लाख ५ हजाराचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक
ही कारवाई पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोउपनि विक्रम विठूबोणे, प्रेमदास चव्हाण, लिंबाजी वाव्हुळे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, महादू शिंदे, प्रशांत वाघमारे, शेख इरफान यांच्या पथकाने केली. गोपनीय व तांत्रिक विश्लेषण (Technical analysis)करून गुन्हा उघड केल्यावर शंभर टक्के मुद्देमाल जप्त केल्याने पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले.




 
			 
		

