हिंगोली (Hingoli Police) : येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू व अनिता दिनकर नव्याने रुजू झाल्याने त्यांचा अधिकारी, कर्मचार्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
येथील लाच लुचपत विभागातील (Hingoli Police) पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, नितीन जाधव यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त पदी परभणी येथील पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू तर नांदेड येथून आलेल्या अनिता दिनकर या दोघांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपला पदभार घेतला आहे. विशेष म्हणजे राजेश मलपिल्लू यांनी या पूर्वी हिंगोली जिल्हा पोलिस दलामध्ये बासंबा पोलिस ठाणे व त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कर्तव्य बजावले आहे. त्यांची बदली यापूर्वी परभणीला झाली होती.