हिंगोली (Hingoli Smart Project) : जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व (Hingoli Smart Project) ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट, हिंगोली कार्यालय मार्फत मूल्यसाखळी विकास शाळा 2024-25 अंतर्गत 6 समुदाय आधारित संस्थेचे संचालक, सभासद अशा एकूण 30 प्रशिक्षाणार्थीना दि. 11 मार्च ते 17 मार्च 2025 या कालावधीत 7 दिवस तेलंगणा राज्यामध्ये राज्याबाहेरील प्रशिक्षणासह अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या (Hingoli Smart Project) प्रशिक्षणासह अभ्यास दौरा वाहनाला हिरवी झेंडी दाखवून प्रस्थान करण्यात आले.
यावेळी हिरवा झेंडा दाखवताना कृषी उपसंचालक पी. एस. हजारे, जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ञ जी. एच. कच्छवे व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हा (Hingoli Smart Project) अभ्यास दौरा निजामाबाद येथील हळद प्रक्रिया युनिट, रुद्रुर येथील केव्हीके, कमरापल्ली हळद संशोधन केंद्र, अरमुर व स्मार्ट फुड पार्क, हैद्राबाद या ठिकाणी आयोजित केला आहे.