औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा व गलांडी येथे घडली आत्महत्येची घटना
हिंगोली (Hingoli Suicide Case) : जिल्ह्यात दोन ठिकाणी आत्महत्या केल्याची नोंद पोलिसात झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील गलांडी येथे घर खर्चासाठी घेतलेल्या हात उसने पैशाच्या चिंतेतून ३५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेतला तर बोरजा शिवारात मुलाच्या शिक्षणाचा खर्च व शेतीचे पीक गेल्याने विषारी औषध पिवून आत्महत्या केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथील बालाजी शंकरराव जगताप (३२) याने महापुरामुळे शेतीचे हाती आलेले पीक गेल्याने तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च व घराचा खर्च वाढत असल्याने तणावाखाली राहून २८ ऑक्टोंबरला बोरजा शिवारातील शेतात विषारी औषध प्राशन केले असता उपचारा दरम्यान ३ नोव्हेंबरला हिंगोली शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. त्याची माहिती गोदावरी जगताप यांनी २० डिसेंबरला औंढा नागनाथ पोलिसात दिली.
तसेच गलांडी येथील गजानन रामजी बेले (३५) याने लोकांकडून घर खर्चासाठी घेतलेले हात उसने पैसे कसे द्यावे या चिंतेतून दिलीप बाजीराव राठोड यांच्या माळावरील शेतातील झाडाला ७ डिसेंबरला गळफास घेऊन आत्महत्या (Hingoli Suicide Case) केली होती. त्याची माहिती ज्योती बेले यांनी २० डिसेंबरला औंढा नागनाथ पोलिसात दिल्याने आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. पुढील तपास रवीकांत हरकाळ हे करीत आहेत.




