सकाळी हिंगोलीच्या जलकुंभात पाणी पुरवठा झाल्यानंतर दुपारी एक वाजता पुन्हा वीज पुरवठा खंडीत
हिंगोली (Hingoli Water supply) : १७ मे रोजी दुपारी ४ च्या सुमारास वादळी वार्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंगोली शहराला पाणी पुरवठा करणार्या वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड (Hingoli Water supply) झाल्याने शहराचा पाणी पुरवठा तब्बल पाच दिवस बंद होता. दुरूस्तीचे काम बुधवारी पुर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सहाव्या दिवशी गुरूवारी सुरू झाला. काही भागात पाणी पुरवठा सोडल्यानंतर दुपारी १. १० वाजता पुन्हा वीज पुरवठा गुल झाल्याने महावितरणच्या वतीने पुन्हा शोध मोहीम सुरू झाली आहे.
हिंगोली शहराला सिध्देश्वर धरणातून पाणी पुरवठा केला जातो. झालेल्या (Hingoli Water supply) वादळी वार्यासह पावसामुळे वीजेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने महावितरणच्या वतीने युध्द पातळीवर दुरूस्तीचे काम करण्यात आले. २२ मे गुरूवार रोजी सकाळी ७ वाजता पलटन भागातील एमजीपीच्या जलकुंभात हा पाणी पुरवठा झाला. सकाळी ११.४० च्या दरम्यान शहरातील मच्छी मार्केट, वडारवाडा, पारधीवाडा, अण्णाभाऊ साठे नगर, मेराजुलूम, हरण चौक, गोदावरी कॉर्नर या भागात पाणी पुरवठा सोडण्यात आला. याचवेळी दुपारी १.१० च्या सुमारास पुन्हा वीज पुरवठा गुल झाल्याने होणारा पाणी पुरवठा बंद झाला. महावितरणच्या वतीने ब्रेक डाऊन जाहीर करून दुरूस्तीकरीता शोध मोहीम सुरू केली.
मागील कांही दिवसापासुन हिंगोली शहरामध्ये मान्सुनपुर्व (Hingoli Water supply) पावसाने हजेरी लावलेली असुन मुसळधार पाणी पडत आहे. त्यामुळे नदी, नाले भरुन वाहत आहेत. तसेच सिध्देश्वर धरणातून हिंगोली शहरास पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु धरण परिसरामध्ये मान्सुनपुर्व मुसळधार पाणी पडत असल्यामुळे हिंगोली शहर पाणीपुरवठा योजनेद्वारे पुढील कांही दिवस गढुळ पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन हिंगोली शहरातील नागरीकांनी पुढील काही दिवस पिण्याचे पाणी उकळुन प्यावे, ज्यामुळे रोगराईस प्रतिबंध होईल.
अरविंद मुंढे, मुख्याधिकारी नगर परिषद, हिंगोली