हिंगोली (Hingoli) : तालुक्यातील पेडगाव (Pedgaon) प्राथमिक शाळेत निपुण गुणवंत्ता विकास अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल झाल्याचे दिसुन आल्याने चौकशी अहवालात सहशिक्षक अरुण कांबळे या हे दोषी आढळुन आल्याने जि. प. सिईओ नेहा भोसले (Dist. W. CEO Neha Bhosale) यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. निपुण गुणवत्तात विकास कार्यक्रमांतर्गत ही पहिली विकेट गेली असून आणखी काही शिक्षक (Teacher) रडारवर असल्याचे वृत्त आहे.
विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल झाल्याने चौकशी अहवाल केला सादर
निपुण हिंगोली गुणवत्ता विकास अभियानांतर्गत (Quality Development Campaign) जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) हे शिक्षण विभागाच्या अधिकार्यासमवेत अनेक शाळांना प्रत्यक्ष भेटी देवुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासत आहेत. त्याच निमित्ताने 20 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी पेडगाव प्राथमिक शाळेला भेट दिली होती. इयत्ता 4 वर्गाची अध्यायन स्तर तपासणी केली असतात संकलीत मुल्यमापन चाचणी क्रमांक 1 अध्यायन स्तरमध्ये तफावत दिसुन आली. त्यानुसार पेडगाव प्रा.शाळेतील सहशिक्षक अरुण नाना कांबळे यांनी ऑक्टोंबर 2024 मध्ये घेतलेल्या संकलीत मुल्यमापन उत्तर पत्रिका वस्तुनिष्ठपणे तपासलेल्या नसल्याचे उघड झाले.
पेडगाव प्रा. शाळेतील शिक्षकावर निलंबनाची कारवाई
विद्यार्थी प्रारंभीक स्तर, मुळाक्षर वाचनस्तर, सोपे शब्द वाचनस्तरावर असून मराठीच्या उत्तर पत्रिकेमध्ये शब्दलेखन, वाक्यलेखन, उत्तर लेखन, सोडुन घेवुन चुकीचे गुणदान मराठीमध्ये केल्याचे दिसुन आले. तसेच गणित विषयात विद्यार्थी 1 ते 10 अंकवाचन स्तर, साधी बेरीज, वजाबाकी स्तरावरील विद्यार्थ्याच्या उत्तर पत्रिकेमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, शाब्दीक उदाहरण सोडुन घेवून चुकीचे गुणदान केल्याचे उघड झाले. तसेच इंग्रजी विषयात 11 वी प्रारंभीक, 06 ही मुळाक्षरस्तरावर असताना त्यांच्या उत्तर पत्रिकेत इंग्रजी संभाषण, कविता गायन, शब्द लेखन, वाक्यलेखन, करून त्यांना चुकीचे गुणदान केल्याचे दिसुन आले.
जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी काढले निलंबनाचे आदेश
मराठी उत्तर पत्रिकेमध्येही (Answer Sheet) काही विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल केलेला दिसुन आला असून काही प्रश्नाचे उत्तरे वेगवेगळ्या हस्ताक्षरात दिसुन आले. याबाबतची चौकशी केल्यानंतर शासकीय (Govt) कामात कसुरी केल्याने 7 जानेवारी रोजी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सिरसम के. प्रा. शा. अंतर्गत पेडगाव प्राथमिक शाळेतील सहशिक्षक अरुण नाना कांबळे यांच्या निलंबनाचे आदेश काढुन निलंबन (Suspension) काळात त्यांना कळमनुरी पंचायत समितीमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.




