हिंगोली (Hingoli) :- जिल्हा पोलीस दलातील अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर भोकर येथील अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना ७ जुलै रोजी कार्यमुक्त करण्यात आले.
परंतु या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे हे रुजू झाले नाही. परंतु आता १४ जुलै रोजी शासनाच्या गृह विभागाने (Home Department) काढलेल्या आदेशात बीड जिल्ह्यातील केज येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 23 जुलै रोजी हिंगोलीत अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.