अंबिका नगरातील घटना!
अज्ञात चोरट्यावर पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल!
पूर्णा (House Burglary) : व्यापार्याच्या घरात चोरी करत अज्ञात चोरट्यांनी १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी रात्रकी उशिरा पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा शहरात भरदिवसा चोरीची घटना!
संकेत अनिल अग्रवाल यांनी तक्रार दिलेली आहे. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० ते सायंकाळी ७ या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या अंबिका नगर येथील राहत्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील आलमारी मधुन १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना देण्यात आली. पो.नि. गोबाडे, सपोनि. शिंदे, पोलिस अंमलदार राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. अज्ञात चोरट्यांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि. सोमनाथ शिंदे करत आहेत. पूर्णा शहरात भरदिवसा चोरीची घटना घडली आहे.




