जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे उपमुख्यमंत्री शिदे यांचे लक्ष वेधणार.!
नंदुरबार (Nandurbar) : अक्कलकुवा येथे दि. 31 मार्च रोजी शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर आभार सभा होणार असल्याची माहिती शिंदे गट शिवसेनेचे नेते आ. चंद्रकात रघुवशी (Chandrakat Raghuvashi) यांनी पत्रपरिषदेत (Press Conference) दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे उपमुख्यमंत्री शिदे यांचे लक्ष वेधणार असल्याचेही सांगितले.
यावेळी पत्रपरिषदेला अक्कलकुवा मतदार संघाचे आ. आमश्या पाडवी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राम रघुवशी आदी उपस्थित होते. आ. रघुवशी पुढे म्हणाले, विधान सभेच्या निवडणूकीनंतर, राज्याचे शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) हे प्रथमच अक्कलकुवा येथे दि. 31 मार्च रोजी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता महाकाली मंदिराशेजारील प्रांगणात भव्य जाहीर आभार सभा होणार आहे. त्याच्यासोबत ना. दादाजी भुसे, ना. गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य नेते मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावेळी आपण जिल्ह्यातील सिंचनासह (Irrigation) तापी-बुराई प्रकल्प, महाराष्ट्रातील भाविकांसाठी देवमोगरा-गुजरात येथे महाराष्ट्र आदिवासी भवन उभारुन देणे, नंदुरबार येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी एखाद मोठा प्रकल्प उभारणे आदी विविध प्रश्नांकडे उपमुख्यमंत्री शिदे यांचे लक्ष वेधणार असल्याची ग्वाही देखील आ. रघुवंशी यानी पत्रपरिषदेतून दिली.