शेतकर्याच्या बांधावर पोहोचले शासनाचे कर्मचारी
सेनगाव (Agriculture Loss) : तालुक्यातील बन, बरडा, पिंपरी या भागातील शेतकर्याच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून सतत होत असलेल्या पावसामुळे बनबर्डा, पिंपरी या भागामध्ये ढगफुटीचे दृश्य झाल्याने घटनास्थळी भाजपा प्रदेश कार्यकारणी विशेष निमंत्रित सदस्य शिवाजीराव मुटकुळे यांनी भेट देऊन शेतीची पाहणी केली होती.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे ,तहसीलदार सखाराम मांडवगडे यांना तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना केल्या असता ३१ जुलै रोजी शासनाच्या कर्मचार्यांकडून थेट शेतकर्याच्या बांधावर जाऊन (Agriculture Loss) शेतकर्याच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.
असून यावेळी तहसीलदार सखाराम मांडवगडे, मंडळ अधिकारी डुकरे, तलाठी यांच्यासोबत शासकीय कर्मचारी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य शिवाजीराव मुटकुळे,माजी सभापती भानुदास पवार, तालुका अध्यक्ष हिमत राठोड, विजय डोखळे, भागवत मुंढे, विजय धाकतोडे, पद्माकर नाईक, दिगंबर शिंदे, नारायणराव कोटकर, लक्ष्मण थोरात, अनिल नागरे, अंकित वाघ, दामोदर गडदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या कर्मचार्यांना (Agriculture Loss) शेतकर्याच्या बांधावर जावून पिंपरी, बन, वझर, बरडा या भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.