नांदेड (Nanded) :- नांदेड शहरातील असर्जन येथील मोदी मैदानावर पंडित प्रदीप मिश्रा (Pradeep Mishra)यांच्या श्री शिव महापुराण कथेला 23 ऑगस्ट रोजी पासून प्रारंभ झाला असून कथा ऐकण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पावसामुळे दोन दिवस कथेला दोन दिवस खंड पडल्यानंतरही कथा ऐकण्यासाठी भाविकांची उत्सुकता कायम आहे. उद्या गुरुवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत कथेनंतर समाप्ती होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्वयंसेवक कार्यान्वित ठेवण्यात आले आहे