गणेशोत्सवानिमित्त इंझोरीत उपक्रम
मानोरा (Blood donation) : तालुक्यातील ग्राम इंझोरी येथे नागरिकांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो दात्यांनी सहभाग नोंदवून हे शिबिर प्रचंड यशस्वी केले. स्थानिक महात्मा फुले रक्तदाता ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने गणपती उत्सवात हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन (Blood donation) रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी धनराज दिघडे यांच्या हस्ते करण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्याची प्रथा इंजोरी या गावातील सुजाण नागरिकांनी जोपासलली. राज्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या आजारामध्ये रुग्णांना गरजेचे असलेले रक्त उपलब्ध व्हावे ह्यासाठी हे रक्त संकलन रक्तदानाच्या माध्यमातून करण्यात आले. याप्रसंगी
अजय जयस्वाल, दुर्योधन काळेकर, रवींद्र काळेकर, देवानंद हळदे, शंकर नागोलकर, आकाश हळदे, सतीश दिघडे, सागर ढोक, खुशाल ढोरे, लीलाधर पायघन, विठ्ठल डहाके, विशाल नरेकर,आकाश ढाकुलकर, सचिन वानखडे, विशाल वानखडे, सतीश भवाने, अंकुश काळेकर, प्रशांत दिघडे, विनायक इंगळे, रुग्णसेवक मयूर शेंडे, संस्थापक अध्यक्ष तुषार जंगले, बादल पायघन यातील सर्व मंडळींनी उपरोक्त शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरात तब्बल १०० पेक्षा अधिक दात्यानी सहभाग नोंदवून हे शिबिर यशस्वी केले.