उपोषणाचा तिसरा दिवस, परभणी महसुल प्रशासन मठ्ठच!
परभणी (Hunger Strike) : परभणीतील सेलू शहरातील तहसील कार्यालयासमोर एका वृद्ध शेतकरी पती-पत्नी (Elderly Couple) यांनी मालकी व ताब्यात असलेल्या शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा. या मागणीसाठी सोमवार 2 जून रोजी दुपारी तीन वाजल्यापासून उपोषण (Hunger Strike) सुरू केले आहे. उपोषणाचा आज बुधवार 4 जून हा तिसरा दिवस आहे. याबाबतची माहिती याप्रमाणे तालुक्यातील राजवाडी येथे गट क्रमांक 57 मध्ये मालकी आणि ताब्यात असलेल्या 40.47 आर जमीन असून सण 2025 पासून वृद्ध शेतकरी रामभाऊ श्रीपती तुरे वय 75 वर्षे राहणार कवडधन तालुका सेलू हे वहिती करत होते. मागील दोन-तीन वर्षापासून शेताशेजारी असलेले, काही शेतकरी (Farmer) राजकीय दबाव आणि बाळाचा वापर करत शेत विक्री कर म्हणून धमकावतात आणि वहिती करण्यास अडथळा निर्माण करतात. तसेच कवडधन येथील एक महिला शेतकरी देखील शेतात जाण्यास आणि वहीती करण्यास अडवणूक करत आहे. यासंदर्भात 29 मे 2025 रोजी उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) यांच्याकडे लेखी दिलेल्या तक्रारीत उद्भवलेल्या प्रसंगाची माहिती देत उपोषणाचा इशारा दिला होता.
शेत वहीती करण्यास सहकार्य करावे अशी मागणी!
तसेच यापूर्वी देखील याच कार्यालयापुढे 3 वेळा उपोषण केले होते. परंतु केवळ आश्वासन देऊन उपोषण उठविण्यात आले होते. सध्या मशागतीचे दिवस असून, शेतात (Farm) मशागत करून पेरणी (Sowing) करावयाची असल्याने संबंधित परिसरातील शेतकरी आडवणूक करत आहेत. म्हणून उपोषणाची तात्काळ दखल घेऊन रस्ता आडविणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि शेत वहीती करण्यास सहकार्य करावे अशी मागणी वृद्ध शेतकरी रामभाऊ श्रीपती तुरे वय 75 वर्षे व पत्नी सीताबाई रामभाऊ तुरे वय 74 वर्ष राहणार कवडधन तालुका सेलू यांनी केली आहे. दरम्यान बुधवार 4 जून हा उपोषणाचा तिसरा दिवस असून, वृद्ध उपोषण करते रामभाऊ तुरे यांची साधी चौकशी देखील महसूल प्रशासनाकडून (Revenue Administration) राजकीय दबावामुळे करण्यात आली नसल्याची खंत उपोषण करते रामभाऊ तुरे यांनी व्यक्त केली आहे.