परभणीतील गंगाखेड-परभणी रस्त्यावरील तरोडा शिवारातील घटना
परभणी/गंगाखेड (Car accident) : जिंतुर तालुक्यातील करवली येथील नातेवाईकांचा विवाह सोहळा आटोपून गंगाखेड तालुक्यातील मुळी गावाकडे परतणार्या बालासाहेब आत्माराम पवार यांच्या दुचाकीचा व कारचा शुक्रवार २५ एप्रिल रोजी दुपारी अंदाजे ४ वाजेच्या सुमारास परभणी – गंगाखेड रस्त्यावरील तरोडा शिवारातील साई नगरी समोरील कॅनलजवळ अपघात झाल्याने या (Car accident) अपघातात बालासाहेब पवार यांचा मृत्यु झाला. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील मुळी येथील रहिवाशी बालासाहेब आत्माराम पवार (वय ४१ वर्ष) व त्यांच्या पत्नी रेखा बालासाहेब पवार (वय ३३ वर्ष) हे दोघे शुक्रवार २५ एप्रिल रोजी जिंतुर तालुक्यातील करवली येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाह सोहळा आटोपून दुचाकी क्रमांक एम.एच. १२ एस.व्ही. ८०६५ वरून गंगाखेड तालुक्यातील मुळी गावाकडे परतत असतांना दुपारी अंदाजे ४ वाजेच्या सुमारास परभणी-गंगाखेड रस्त्यावरील तरोडा शिवारातील साई नगरी समोरील कॅनलजवळ दुचाकी व कार क्रमांक एम.एच. ०८ आर. ६९६८ यांच्यात झालेल्या अपघातात बालासाहेब आत्माराम पवार यांचा मृत्यु (Car accident) झाला तर त्यांच्या पत्नी रेखा बालासाहेब पवार या गंभीर जखमी झाल्या आहेत.
त्यांच्यावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कार -दुचाकी अपघातात बालासाहेब आत्माराम पवार यांचा मृत्यु झाल्याची माहिती समजताच मुळी गावात शोककळा पसरली असुन शनिवार रोजी सकाळी त्यांच्यावर मुळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या (Car accident) प्रकरणी जानकीराम गिरीधर पवार रा. मुळी ता. गंगाखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक मयुर शाम पाटील (रा. वरफळ ता. परतूर जि. जालना) यांच्याविरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.