देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Rojgar Melava: रोजगार मेळाव्यात 96 उमेदवारांची निवड
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Rojgar Melava: रोजगार मेळाव्यात 96 उमेदवारांची निवड
मराठवाडाहिंगोली

Hingoli Rojgar Melava: रोजगार मेळाव्यात 96 उमेदवारांची निवड

Deshonnati Digital
Last updated: 2025/08/22 at 9:05 PM
By Deshonnati Digital Published August 22, 2025
Share
Hingoli Rojgar Melava

हिंगोली (Hingoli Rojgar Melava) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयात “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर या पात्रतेच्या 233 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 96 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. तळणीकर हे होते. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. व्ही. बोथीकर, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष रमन तोष्णीवाल, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे, डॉ. आर. ए. जोशी, डॉ. वाय. एस. नलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यात विविध महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.

या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्राचार्य बोथीकर यांनी मुलाखतीचे ठोकताळे सांगत करियरसाठी स्वत:चे गाव सोडून उमेदवारांनी मिळेल तेथे नोकरी मिळवावी आणि स्वत:ची क्षमता सिद्ध करावी, असा मंत्र दिला. रमण तोष्णीवाल यांनी आपल्या परिसरातील कामाच्या मागणीनुसार स्वत: रोजगार मिळवत युवकांनी रोजगार निर्मिती करणारे बनावे, असे आवाहन केले. सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी साचेबद्ध सरकारी नोकरीची अपेक्षा न बाळगता खाजगी क्षेत्रातील संधीचे सोने करावेत, असा सल्ला दिला. अध्यक्षीय समारोपात डॉ. तळणीकर यांनी रोजगार मेळावे ही युवकांसाठी चालून आलेली संधी आहे. या संधीचे सोने करावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टी. यु. केंद्रे यांनी तर आभार डॉ. डी. जी. सावंत यांनी मानले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे नवनाथ टोनपे, राजाभाऊ कदम, नागेश निरदुडे, रमेश जाधव, पवन पांडे, प्रवीण राठोड, अभिजीत अलोने आणि तोष्णीवाल महाविद्यालयाचे प्राध्यापक ए. पी. नाईक, डॉ. एन. एस. बजाज, डॉ. पी. एन. तोतला, डी.डी.थोरात, एस. एस. मरकड, डी. पी. तडस, एन. एस. गायकवाड, के. एस. पवार, एच. टी. शिंदे, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

You Might Also Like

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

NCP Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार

TAGGED: Hingoli Rojgar Melava
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भगोंदिया

Gondia: फायनान्स कंपन्यांची ‘सावकारी’, प्रत्येक कुटूंबातील महिला कर्जबाजारी

Deshonnati Digital Deshonnati Digital August 26, 2024
Wedding Helicopter: नवरीसाठी पाठवले सासऱ्याने हेलिकॉप्टर!
Latur MIDC police: एमआयडीसी पोलीस ठाण्याला 15 मार्चपर्यंत ‘अल्टीमेटम’!
Pauni Anganwadi: अंगणवाडीतील बालकांना दूषीत बुरशी, अळ्या असलेल्या सोनपापडीचा वाटप
Deputy CM Eknath Shinde: रानडुकराच्या हल्ल्यात जखमी शेतकर्‍यास उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Lok Andolan Nyas
मराठवाडाहिंगोली

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

October 20, 2025
Hingoli Janata Samvad
मराठवाडाहिंगोली

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?