देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Cemetery: सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघात 20 गावांना मिळेना स्मशानभूमी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Cemetery: सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघात 20 गावांना मिळेना स्मशानभूमी!
मराठवाडालातूर

Cemetery: सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघात 20 गावांना मिळेना स्मशानभूमी!

Deshonnati Digital
Last updated: 2025/07/09 at 6:22 PM
By Deshonnati Digital Published July 9, 2025
Share
Cemetery

33 गावांमध्ये उघड्यावरच करावे लागतात अंत्यसंस्कार!

चाकूर (Cemetery) : ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…’ सुरेश भटांनी या कवितेतून मरणही सुसह्य असल्याचे सांगितले असले, तरी 20 गावांना स्मशानभूमी नसलेल्या आणि 33 गावांमध्ये उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेल्या चाकूर तालुक्यात पावसाळ्यामुळे सरण विझण्याची वेळ आल्याने गावकऱ्यांना (Villagers) अनंत यातना भोगाव्या लागत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री असलेले राष्ट्रवादीचे आ. बाबासाहेब पाटील यांच्या मतदारसंघात ही दुरवस्था आहे.

सारांश
33 गावांमध्ये उघड्यावरच करावे लागतात अंत्यसंस्कार!लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचेही दुर्लक्ष कायम!स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते कच्या स्वरूपातील!खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारी खेडी आजही विकासापासून कोसोदूर…गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी आवश्यक!त्या घटनेनंतरही शेळगावकडे दुर्लक्ष!दहनभूमी नसलेली गावे….स्मशानभूमी शेड नसलेले गावे!दफणभूमी नसलेले गावे!

लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचेही दुर्लक्ष कायम!

चाकूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावाला दहनभूमी, दफणभूमी जागा नाही, स्मशानभूमी शेडच नाही, शवदाहिनींची दुरवस्था (Bad Condition) झाली आहे. परिणामी स्वतःच्या किंवा इतरांच्या शेतात अथवा नदी-नाल्याकाठी उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ गावागावांमध्ये आली आहे. अशात पाऊस सुरू झाल्यास रचलेले सरण विझण्याच्या बिकट प्रसंगास सामोरे जावे लागत असल्याने, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने (Administration) या मुलभूत सुविधेकडे गांभीर्याने लक्ष देऊन मृतदेहाची होणारी अवहेलना, विटबंना थांबवावी, अशी केविलवाणी मागणी सर्व नागरिकातून होत आहे.

स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते कच्या स्वरूपातील!

चाकूर तालुक्यात 71 ग्रामपंचायती आणि 81 गावे आहेत. यातील 15 गावांमध्ये अधिकृत दहनभूमी नाही, 20 गावात दफणभूमी नाही तर 33 गावांमध्ये स्मशानभूमी शेडच नाही. कांही गावांमध्ये स्मशानभूनी नावापुरतीच उभी आहे. अनेक ठिकाणी मृतदेहास अग्नी देण्याकरीता आवश्यक असलेले शेड सुस्थितीत नसून, शवदाहिनींची दुरवस्था झालेली आहे. स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते कच्या स्वरूपातील असल्याने पावसाळ्यात अंत्यविधीस येणाऱ्यांना चिखल तुडवावा लागत आहे. स्मशानभूमीच्या परिसरात उगवणारी निरुपयोगी झाडे, गवतही पावसाळ्याच्या दिवसांतील डोकेदुखी आजही कायम आहे.

खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारी खेडी आजही विकासापासून कोसोदूर…

देशासह महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात (Economic Development) ग्रामीण भागातील खेड्यांचा मोठा वाटा असला तरी, खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारी खेडी आजही विकासापासून कोसोदूर आहेत. तालुक्यातील अनेक गावे, वाडी, वस्ती, तांड्यांवर आजही मूलभूत सुविधांचा मोठा अभाव असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. म्हणून शासनाने स्मशानभूमी व दफणभूमी साठी जागा तसेच स्मशानभूमी शेड, रस्ता, अदी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी आवश्यक!

जीवन जगत असताना विविध समस्याचा धैर्याने सामना करणाऱ्याची मृत्यूनंतर तरी अवहेलना व्हावयाला नको, यासाठी प्रत्येक ठिकाणी स्मशानभूमीशेड, बैठक व्यवस्थेसह सुसज्ज स्मशानभूमी असायला हवी. प्रत्यक्षात अनेक गावामध्ये स्मशानभूमी नसल्याने शेतांमध्ये अंत्यविधी उरकावा लागत आहे. उन्हाळा आणि हिवाळ्यात अडचण जाणवत नाही. मात्र पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर होतो त्यामुळे गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी असायालाच हवी.

– नागीण पाटील, सरपंच

त्या घटनेनंतरही शेळगावकडे दुर्लक्ष!

गतवर्षी शेळगाव येथे पोलीस पाटील यांचे निधन झाले. अंत्यसंस्काराची वेळ निश्चित करणयात आली. त्यानुसार पाहुणे मंडळीनी हजेरी लावली. मात्र त्याचवेळी पाऊस सुरु झाल्याने आधी पत्र्याचे शेड उभारावे लागले आणि नंतरच अंत्यसंस्कार पूर्ण करता येणे शक्य झाले. तसेच नदीच्या काठावर सरण रचले असता पुरामध्ये प्रेत वाहून जाण्याचा प्रसंग घडला, प्रेताची विटंबना झाली. नागरिकांतून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्व वरीष्ठ अधिकारी गावाला भेट दिली, मात्र स्मशानभूमी शेड शासनाने आजपर्यंत मंजूर केले नाही.

– मनोज नानासाहेब पाटील

दहनभूमी नसलेली गावे….

तिवटघाळ, तळघाळ, मुरंबी, लातूर रोड, मांडूरकी, हटकरवाडी, भाकरवाडी, मष्णेरवाडी, नळेगाव, संगाचीवाडी, मंहाडोळ, सांडोळ,ब्रम्हवाडी, नागेशवाडी या गावात स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्मशानभूमीची जागाच नाही.

स्मशानभूमी शेड नसलेले गावे!

तिवटघाळ, तळघाळ, मुरंबी, शिवणखेड(बु.), जगळपूर, लातूर रोड, मांडूरकी, नागदरवाडी, हटकरवाडी, भाकरवाडी, ब्रम्हवाडी, टाकळगाव, बोरगाव(बु), झरी(बु), घारोळा, मष्णेरवाडी, झरी(खु), नळेगाव, तिर्थवाडी, ब्रम्हवाडी, शिरनाळ, शेळगाव, संगाचीवाडी, मंहाडोळ, सांडोळ, हाडोळी, मोहदळ, ब्रम्हवाडी, नागेशवाडी, रायवाडी, राजेवाडी, बोथी, बावलगाव.

दफणभूमी नसलेले गावे!

दापक्याळ, लातूर रोड, माडूंरकी, बोथी, कबनसांगवी, मष्णेरवाडी, बावलगाव, टाकळगांव कडमूळी, मंहाडोळ, सांडोळ, शेळगाव, संगाचीवाडी,चवळेवाडी, लिंबाळवाडी, तीवघाळ, तीवटघाळ, तळघाळ, मूरंबी, बेलगाव आदी गावात अधिकृत दफणभूमी नसल्याने शेतामध्ये, इतरत्र अंत्यविधी करावे लागतात.

You Might Also Like

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

NCP Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार

TAGGED: Administration, bad condition, Cemetery, Economic Development, Villagers
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Kasbegawhan Village: कसबेगव्हाण येथील पुनर्वसित पाचशे ग्रामस्थांच्या जीवनात उजाडली नवी पहाट!

Deshonnati Digital Deshonnati Digital October 14, 2024
ShivSena Dharane Andolan: सरसकट कर्जमाफी साठी शिवसेना उबाठा गटाचे धरणे आंदोलन
 Patur Naib Tehsildar: पातूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
Akola: मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; एक ठार, एक गंभीर
World Heritage: गडकिल्ल्यांना जागतिक वारसा प्रदान म्हणजे, हे छत्रपतींचे वैश्विक मोठेपण होय!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Lok Andolan Nyas
मराठवाडाहिंगोली

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

October 20, 2025
Hingoli Janata Samvad
मराठवाडाहिंगोली

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?