हिंगोली (Illegal liquor sellers) : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावून घेतल्यानंतर त्यांची झाडाझडती केली. तसेच त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई केली जाईल असा इशाराही दिला.
हिंगोली जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर (Illegal liquor sellers) निर्बंध घालण्याकरीता जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कंबर कसली आहे. अनेक ठिकाणी अवैध देशी दारू व हातभट्टी विक्री होत असल्याने त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावून घेतल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी चांगलाच दम देऊन यापूढे अवैध दारू विक्री केल्यास त्यांच्यावर एमपीडीए, हद्दपार, संघटीत गुन्हेगारी सारखी कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
जिल्हा पोलिस दलातर्फे अवैध दारू विक्रीबाबत (Illegal liquor sellers) नेहमीच कठोर कारवाई केली जात असुन यापुढे सुध्दा पोलिस ठाणे स्तरावर विशेष पथकाची स्थापना करून अवैध दारू, हातभट्टी विकणार्यावर कारवाई करून अटक केली जाणार आहे. या संदर्भात जिल्ह्यातील १३ ही पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्न्हे शाखा, विशेष पोलिस पथकास अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिल्या आहेत.