चिखली(Buldhana):- कौटुंबिक तसेच शेती संपतीच्या वादातून पतीने पत्नी व तिच्या मावस भावाला भरधाव वाहनाने धडक देऊन 30 सप्टेंबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोरील चौकात जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या धडकेत गंभीर जख्मी झालेल्या पत्नीचा दोन आक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. एकंदरीतच संपत्तीच्या संबंधातून उद्भवलेल्या वादातील सविता सुरडकर मूत्यू(Death) प्रकरणात समाधान सुरडकर व इतर साथीदारावर चिखली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून एका संशयितास ३ आक्टोबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
इतर साथीदारावर खुनाचा गुन्हा दाखल, एक संशयित पोलिसांनी घेतल ताब्यात
यासंदर्भात सौ सविता समाधान सुरडकर यांचा मावस भाऊ केशव भानुदास महाले व 48 वर्ष राहणार कव्हळा हल्ली मुक्काम श्रीकृष्ण नगर चिखली यांनी चिखली पोलिसात दिलेल्या माहितीवरून दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास केशव भानुदास महाले व त्याची मावस बहीण सविता समाधान सुरडकर हे दोघे मोटरसायकलवर बसून घराकडे जात असताना चिखली तहसील कार्यालयासमोरील चौकामध्ये आरोपी समाधान सुरडकर यांनी कौटुंबिक व कोर्टातील (Court)शेतीच्या वादातून त्याची ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून मोटरसायकल वरील तिघा जणांना जीवे मारण्याच्या उद्देशाने धडक दिली. यामध्ये सविता समाधान सुरडकर या गंभीरित्या जखमी (Injured) झाल्या होत्या. या घटनेनंतर त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांच्या डोक्याला व मेंदूला मोठ्या प्रमाणात मार लागल्यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयातून तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दोन आक्टोबर रोजी सविता सुरडकर चा मृत्यू झाला.
दोन आक्टोबर रोजी सविता सुरडकर यांचा मृत्यू
चिखली पोलिसांनी आरोपी समाधान धनसिंग सुरडकर रा. बेराळा ह.मु. देहु पुणे विरुद्ध अप नं.- 0733/24 कलम 109 भारतीय न्यास संहीता नुसार एक आक्टोबर रोजीच गुन्हा नोंद केली होता. सुरुवातीला पोलिसांनी कलम 109 अन्वये गुन्हा (Crime)दाखल केला होता. मात्र सविता सुरडकर च्या मृत्यूनंतर ३आक्टोबर रोजी गुन्ह्यात वाढ करून भारतीय न्याय संहिता १०३ (१), खुन करणे आणि ६१ (२)असं फौजदार पात्रकट रचने आधी गुन्ह्याचा समावेश केला असून कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवत एका संशयितास चिखली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेच्या काही तासापूर्वी सविता सुरडकर सोबत ज्याचा वाद झाला होता व त्या भांडणा संदर्भात जो व्यक्ती चिखली पोलीस स्टेशनला (Police Station)रिपोर्ट देण्यासाठी आला होता, त्याला ३आक्टोबर रोजी चिखली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
एकंदरीतच पुणे येथील प्रॉपर्टीचा मालकी हक्क वाद आणि बेराळा येथील शेती संदर्भातील प्रॉपर्टीच्या (Property) संदर्भाने चिखली महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचारी वर्गाने चुकीचा न्याय दिल्याच्या आरोपावरून दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच सविता सुरडकरचा झालेला मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात असल्याने पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत.




