Yawatmal :- वेणी अधर पुस धरण (सवना कम्प) महागांवच्या उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग (Patbandhare Subdivision) क्र. ४ यांनी पुस धरणातील जलपर्णी काढण्याचा कामात निविदा मॅनेज करून मोठा भ्रष्टाचार केला आहे.या संदर्भात तक्रारी केल्यानंतरही गैरव्यवहारात गुंतलेल्यांच्या हातानेच चौकशी केली जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून कोट्यावधींचा गैरव्यवहार करणार्यांना अभय दिल्या जात असून अखेर जलसंपदा विभागाच्या भ्रष्ट कार्यपध्दतीला कंटाळून १० सप्टेंबर रोजी त्याच धरणात जलसमाधी घेणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादीचे (nationalist) ओबीसी सेलचे महागाव तालुका अध्यक्ष रूपेश नथ्थू मोरे यांनी अधिक्षक अभियंता,यवतमाळ सिंचन मंडळ यवतमाळ यांना दिले आहे.
राष्ट्रवादीचे ओबीसी सेल तालुका अध्यक्षांचे अधिक्षक अभियंत्यांना निवेदन
जलपर्णी काढण्याच्या कामांमधील निविदा प्रक्रियेमध्ये सहा निविदा अपात्र करून हित संबंधीत जोपासून तांत्रीक दृष्टया योग्य साधने उपलब्ध नसणा-या अटीशर्तीची पुर्तता करू न शकणार्या कंत्राटदाराला ही निविदा मॅनेज करून दिली आहे. व संपूर्ण बिल परस्पर काढण्यात आले. अशा पध्दतीने शासनाचा एक कोटी पंचविस लाख रूपयाचा चुराडा झाला केला आहे. तरंगता मलबा काढण्याच्या कामामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची रितसर तक्रार रुपेश मोरे यांनी जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई, कार्यकारी संचालक विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळ नागपूर व मुख्य अभियंता जलसंपदाविभाग अमरावती यांना दिली होती. त्यांनी हे प्रकरण अधिक्षक अभियंता यांना कार्यवाही करण्यासाठी वर्ग केले परंतु आता पर्यंत उप विभागीय अभियंता पाठबंधारे उपविभाग क्र.४ यांचेवर कुठल्याही प्रकारे कार्यवाही झालेली नाही. उलट प्रकरण आपल्यास्तवरून मॅनेज करण्याचा प्रयत्न अधिक्षक अभियंता यवतमाळ सिंचन विभाग यांच्याकडून होत असल्याचे तक्रारदाराच्या निर्देशनास येत आहे. त्यामुळे यवतमाळ सिंचन कार्यालयाच्या ढिसाळ कारभारापुढे रूपेश मोरे यांची निराशा झाली.