देशोन्नती वृत्तसंकलन
चंद्रपूर/कोरपना (Korpana Police) : पोलीस हे जनतेचे रक्षक असून “सदरक्षणालंय खालनींग्रहनालय” हे या विभागाच ब्रीद आहेत. मात्र या वाक्याला हरताळ फासून गालबोट लावण्याचे काम काही पोलिसांकडून होत असल्याची बाब समोर येत आहेत. ‘रक्षकच होत आहे भक्षक’ म्हणायला वाव नाही. मागील गुन्हाच्या तपासाच्या संबंधाने (Korpana Police) पोलीस ठाण्यात बोलावून कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदारांनी अश्लील भाषेत शिवीगाळ पट्ट्या पट्ट्याने मारहाण करीत झोपून काढले. सदर प्रकरण शनिवार दिनांक ८ जून रोजी ची ही घटना आहे.
कोरपना पोलीस स्टेशन येथील प्रकार
सदर प्रकरणाची तक्रार (Chandrapur Police) जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली. विपुल देविदास मुनावत असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहेत. तक्रारीत दिलेल्या प्रमाणे सविस्तर वृत्त असे की दि.७ जून ला शुक्रवार ला सायंकाळी अंदाजे ७ वाजता (Korpana Police) कोरपणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप एकाडे तसेच ट्राफिक पोलीस शिपाई व एक महिला पोलीस घेऊन धानोली पोस्ट असलेल्या तांडा क्र.१ या गावात आले. तक्रार कर्त्याच्या काका रमेश मुनावत यांचे घरी दारू आहे. म्हणून घर तपासण्यासाठी गेले, घरी लहान बहीण घरात होती. तक्रार कर्त्याने पोलिसांना म्हटले की, साहेब घरात कुनीही नाही, तेव्हा पोलिसांनी तू सरकारी कामात अडथळा आणू नकोस, म्हणत धमकविले. काकाचे घर तपासल्यानंतर तक्रार कर्ते विपुल यांचे घराची सुद्धा झडती घेतली. मात्र काहीच मिळाले नाही. त्यावेळेस ठाणेदार यांनी “तुझ्या वर मागील गुन्हाचा तपास बाकी आहेत. तू उद्या ठाण्यात ये नाही तर बघ”, असे तक्रार दार विपुल याला बोलून पोलीस निघून गेले.
जी. पो. अधीक्षकांकडे तक्रार
त्यांनतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ जून शनिवारला सकाळी १०.३० वाजता तक्रार कर्ते पोहचले असता, (Korpana Police) ठाणेदार यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून अश्लील शिवीगाळ करीत मंचक देवकते नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पट्टा घेऊन बोलाविले. त्या पोलिसाला सांगितले की, याला ५० पट्टे मार म्हणून सांगितले. त्यांनतर त्या पोलीस कर्मचाऱ्याचा हातून मला पट्ट्या पट्याने सूज येईपर्यंत मारहाण केली. त्यांनतर “तू दवाखान्यात (Korpana Hospital) गेला आणि मेडिकल केला तर, तुला आणखी मारतो” म्हणत धमकी देत गावाला परत पाठविले. त्यांनतर गावातील लोकांनी मला दवाखान्यात नेले आणि माझे मेडिकल केले, असे विपुलनी दिलेल्या तक्रारीत नमूद असून कारवाईची मागणी करण्यात आली आहेत.
मोबाईल रेकॉर्डिंग च्या माध्यमातून समोर आला प्रकार
मारहाण झालेले तक्रार दार यांनी (Korpana Police) पोलीस ठाण्यात पोहचण्या पूर्वी मोबाईल ची रेकॉर्डिंग सुरु करून ठेवली होती. मात्र या बाबत पोलिसांना माहिती नाही. हा सर्व कोरपना पोलिसांचा प्रकार समाज माध्यामांवर वायरल होत असून कोरपना ठाणेदार यांचा निषेध नोंदविण्यात येत असून, अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाइची मागणी होत आहे
(आरोपीवर काही महिन्या अगोदर गुन्हा दाखल होता त्या संबधीत माहिती विचारण्यासाठी त्याला पोलीस स्टेशनला बोलाविले मात्र आरोपीने जो आरोप केला त्यात काही तथ्य नाही)
– ठाणेदार संदीप एकाडे, पोलीस स्टेशन कोरपना