नवी दिल्ली (India-Pakistan) : भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. भारताच्या हवाई हल्ल्यांमुळे (Indian Air Strike) पाकिस्तान इतका घाबरला होता की, त्याने अमेरिकेला फोनही केला. माहितीनुसार, पाकिस्तानने अमेरिकेला सांगितले की, भारत आमच्या अणुकेंद्रावर ब्रह्मोस क्षेपणास्त्राने (BrahMos Missile) हल्ला करेल. त्यामुळे भीतीपोटी पाकिस्तानने अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला (Trump Administration) युद्धबंदीसाठी आवाहन केले.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीबाबत थेट चर्चा!
यानंतर, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो (National Security Advisor Marco Rubio) यांनी युद्धबंदीच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar) यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भारताने युद्धबंदीला सहमती देण्यास स्पष्ट नकार दिला. भारताने अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांना सांगितले की, हा दोन्ही देशांमधील विषय आहे. पाकिस्तानने स्वतः पुढे येऊन युद्धबंदीबद्दल बोलले पाहिजे. त्यानंतर पाकिस्तानचे डीजीएमओ आणि भारताचे डीजीएमओ राजीव घई यांच्यात चर्चा झाली आणि शनिवारी (10 मे) युद्धबंदीची घोषणा करण्यात आली.
आज दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये काय चर्चा झाली?
सोमवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (DGMO) यांच्यात युद्धबंदीबाबत चर्चा झाली. ही चर्चा भारताचे डीजीएमओ राजीव घई आणि पाकिस्तानचे डीजीएमओ काशिफ अब्दुल्ला चौधरी (Kashif Abdullah Chaudhary) यांच्यात झाली. यामध्ये भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की, दहशतवाद (Terrorism) संपवण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात आले आहे. आता आपण सीमेवर दहशतवाद्यांना मारू.