लोकशाही दिनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन !
बुलडाणा (Indian Constitution) : भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिकरित्या वाचन करुन जागतिक लोकशाही दिन साजरा करण्यात आला. प्रत्येक देशात लोकशाहीच्या तत्त्वांचा प्रचार आणि समर्थन करण्यासाठी दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी जागतिक लोकशाही दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २००७ साली जागतिक लोकशाही दिनाची सुरुवात झाली. (Indian Constitution) जागतिक लोकशाही दिन पहिल्यांदा १५ सप्टेंबर २००८ रोजी साजरा करण्यात आला.
या अंतर्गत जगाच्या कानाकोपऱ्यात सुशासन राबविणे हाच याचा उद्देश आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारख्या सर्वसमावेशक मुल्यांवर लोकशाही टिकलेली आहे. लोकांनी, लोकांच्या हितासाठी, लोकांकडून चालवली जाणारी सुव्यवस्था म्हणजे आपली लोकशाही. या यंत्रणेत प्रत्येक नागरिकांच्या मताला, त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या लोक कल्याणकारी स्वराज्याची संकल्पना यातून मूर्त स्वरुपात साकार झाली आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. भारतीय नागरिकांना (Indian Constitution) संविधानाने दिलेले अधिकार, राज्यकर्त्यांना घालून दिलेल्या मर्यादा, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारखे सर्वसमावेशक मुल्य यावर आजपर्यंत भारतीय लोकशाही अबाधित आहे. त्याअनुषंगाने १५ सप्टेंबर २०२४ रोजी बुलडाणा येथे तथागत गौतम बुध्द, क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या सचिव ॲड. जयश्रीताई शेळके (Jayashree Shelke) यांच्या नेतृत्वात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन जागतिक लोकशाही दिन साजरा करण्यात आला.
ॲड. जयश्रीताई शेळके (Jayashree Shelke) यावेळी बोलताना म्हणाल्या की, भारतीय संविधानच (Indian Constitution) भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. आज देशात, राज्यात आणि बुलडाणा विधानसभा मतदारसंघात ही लोकशाहीची गळचेपी करून हुकूमशाही आणि गुंडशाहीचे वातावरण पसरवले जात आहे. त्यामुळे लोकशाहीचा आणि सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, संजय राठोड, प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष मिनलताई आंबेकर, प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस नंदिनी टारपे, जिल्हा कॉग्रेसचे सरचिटणीस सुनिल सपकाळ, शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस, माजी सभापती अंकुश वाघ, माजी नगरपालिका उपाध्यक्ष विनोद बेंडवाल, आझाद हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष सतिशश्चंद्र रोठे, महाराष्ट्र प्रदेश एस. सी. सेलचे सचिव गौतम मोरे, एन.एस.यु.आय.चे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर, जाकीर कुरेशी, विनोद गवई, सुधाकर बोर्डे, संदीप मगर, प्रा.प्रदिप जाधव, अनंत गवई, बाबुराव सुरडकर, अनंत गवई, सागर जाधव, विशांत सरकटे, मो. दानिश, समीर चौधरी, अनिस टेलर, सय्यद साहेब, मुजफ्फर सर, अविनाश जाधव, बाला राऊत, श्रीकांत जाधव, तुषार खरे, आकाश गवई, मुकेश सिरसाट, संतोष भागिले, रविंद्र बुंधे, सविता डुकरे, अंजली मिसाळकर, मोहिनी मिसाळकर, मंदाकिनी आराख, सुनिता मगर, रोशनी मगर, सुशिलाबाई पन्हाड, अर्चना निर्मळ, दुर्गाताई जाधव, यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.