परभणीच्या देवनांद्रा शिवारात राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार!
परभणी (Infant Case) : परभणीतील पाथरी तालुक्यात पुणे येथून परभणीकडे जाणार्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये (Travels Bus) प्रवास करत असलेल्या 19 वर्षीय विवाहितेने प्रसुती नंतर ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून पुरुष जातीचे अर्भक (Infant) महामार्गावर फेकले. ही घटना तालुक्यातील देवनांद्रा शिवारात सोमवार 14 जुलै रोजी घडली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई (Prompt Action) करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात!
पाथरी-सेलू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 वर शहरापासून 2 किमी अंतरावर देवनांद्रा शिवारात हा प्रकार उघडकीस आला. शेतात काम करणार्या एका व्यक्तीने सदर प्रकार पाहिल्या बरोबर 112 क्रमांकावर फोन करुन पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोनि. महेश लांडगे, पोह. विष्णू वाघ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आले. ट्रॅव्हल्सचा शोध घेतला असता, गाडी सेलू मार्गे परभणीच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यानंतर, पोलिसांनी काही वेळातच ट्रॅव्हल्सचा शोध लावला. गाडीतून प्रवास करणारी 19 वर्षीय तरुणी आणि 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधितांविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की, सदर दोघांनी अंतरजातीय प्रेम संबंधातून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे पुणे येथे कामाला होते.
तरुणीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले!
सोमवारी तरुणीच्या पोटात वेदना होत असल्याने पुण्याहून परभणीला खाजगी ट्रॅव्हल्सने येत होते. प्राथमिक चौकशीत युवकाने प्रवासादरम्यान, तरुणीला प्रसुती झाली. मात्र, अर्भक मृत जन्मले आणि त्यानंतर, तिने ते ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून बाहेर फेकले, असे सांगितले. तरुणीला पुढील उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रॅव्हल्स बस ताब्यात घेत पोलीस ठाण्यात लावली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल (Filed a Case) करण्याची प्रक्रिसा सुरू होती.