Yawatmal murder case :- खंडाळा पोलीस स्टेशन (Police station)अंतर्गत येत असलेल्या खंडाळा पासून काही अंतरावर पुर्ववैमनस्यातून खून केल्याची घटना घडली. याबाबत शेख इरफान उर्फ अप्पु शेख रहमान (६५) रा. अमृतनगर खंडाळा यांच्या पाच मुलांचे मागील एका खून(murder) प्रकरणात नाव टाकले होते. तर शेख रहमान हे कामानिमित्त मुंबई (Mumbai)येथे गेले होते ते दोन दिवसांपूर्वी अमृतनगर येथे आले.
छातीवर गळ्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार
त्यावेळी गावातील शेख नबी शेख मुसा, शेख बरकत शेख मुसा, शेख कौसर शेख कुरबान, शेख साहिल शेख शफी व शेख सबदर शेख कुरबान यांनी घरी येऊन तुझा नवरा कसा काय गावात आला तो भेटला तर जीवानीशी मारेन अशी धमकी दिली. त्यानंतर १४ सप्टेंबर ला गावातील शेख नबी शेख मुसा घरी आला व शेख इरफान यांना गाडीवर बसवून रात्री दहा वाजता घेऊन गेला. आम्ही त्यांची रात्रभर वाट पाहीली परंतु ते घरी आले नाही. १५ सप्टेंबरला सुने जवळ येऊन त्या तिघांनी ‘अपना काम हो गया उसको ठपका दिया’ असे म्हणून निघून गेले. काही वेळानंतर एका व्यक्तीचा मृतदेह (Deadbody)खंडाळा वाशीम रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच , पोलिसांच्या गाडीत जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह शेख इरफान चा असल्याचे दिसुन आले. त्यांच्या छातीवर गळ्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने मारल्याचे दिसून आले.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला खुनाने संगनमत करून घेतल्याची तक्रार मयताची पत्नी बेगम बी शेख इरफान यांनी खंडाळा पोलीसात दिली असून विविध कलमान्वये तिघा जणांविरुद्ध उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधकामी पथके रवाना झाल्याचे खंडाळा ठाणेदार विनित घागे यांनी सांगितले.