Pandharkawda :- तालुक्यातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरुन जनावरांच्या वाहनांची पायलटिंग करून ती वाहने तेलंगणात सोडण्यात येत आहे. हायवेवर मध्यरात्री दरम्यान पायलटिंग (piloting) करणार्यांना युवकांच्या गटाचा हैदोस सुरु असुन त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी तालुक्यातील गो-प्रेमीतुन करण्यात येत आहे.
जनावरांच्या तस्करीमध्ये थेट सहभागी असलेल्या पोलीस कर्मचार्यांना तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षकांनी निलंबित केले
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून पून्हा जनावरांच्या तस्करीत (smuggling) वाढ होत चालली आहे. जनावरांची वाहने तेलंगणामध्ये सोडण्याकरीता त्या वाहनांची पायलटिंग करण्याकरीता पांढरकवडा व पाटणबोरी येथील काही युवकांचे गट कार्यरत आहे. जनावरांच्या वाहनांची पायलटिंग करणार्या युवकाच्या गटातील सदस्य प्रत्येक जनावरांच्या गाडी मागे ३० ते ४० हजार रुपये वसुली करीत असल्याची चर्चा आहे. त्या गटांच्या वतीने दैनदिन ५० ते ६० जनावरांची वाहने कोणत्याही आडकाठीविना तेलंगणात पास करुन देण्यात येत असल्याचेही बोलल्या जात आहे. तालुक्यातील जनावर तस्करी चा मोरक्या संदीप पुन्हा सक्रिय झाल्याने जनावर तस्करी मध्ये वाढ झाल्याचे गो-प्रेमीतुन सांगण्यात येत आहे. परंतु ऐवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरांची (Animals) वाहने हायवेने तेलंगणात सोडण्यात येत असतांना त्याची माहिती स्थानिक प्रशासनास नाही म्हणजे नवलच म्हणावे लागेल. याआधी जनावरांच्या तस्करीमध्ये थेट सहभागी असलेल्या पोलीस कर्मचार्यांना तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षकांनी निलंबित केले होते. तर काहींना मुख्यालयाची हवा खावी लागली होती.
विशेष म्हणजे पोलीसांच्या वतीने जनावरांच्या वाहनांवर अधुन, मधुन कार्यवाहीचे सत्र सुरु आहे. विद्यमान ठाणेदाराच्या कार्यकाळात कधी नव्हे ऐवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यवाह्या करण्यात आल्या. मात्र तरी सुद्धा जनावर तस्करी काही कमी होतांना दिसून येत नाही. खर तर जनावर तस्करी मध्ये काही पोलीसांचा सुध्दा समावेश असल्याचे बोलल्या जात आहे त्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तपास करण्याची मागणी गो-प्रेमीतुन करण्यात येत आहे. जनावर तस्करीचा मास्टर मांईड असलेला तो संदीप पुन्हा एकदा सक्रीय झाल्याने हायवेवर तस्करांच्या विविध गटात वादही वाढत असल्याचे बोलल्या जात आहे.




