परभणी पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांची संकल्पना
परभणी (Parbhani police) : विविध गुन्ह्यातील तसेच गहाळ प्रकरणात पोलीसांनी जप्त केलेला मुद्देमाल मुळ मालकाला परत देण्यात आला. पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या उपक्रमात बुधवार २७ मार्च रोजी फिर्यादींना २३ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल परत देण्यात आला आहे. (Parbhani police) पोलीस अधिक्षक कार्यालयात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध (Parbhani police) पोलीस स्टेशनमध्ये मागील काही दिवसांपासून नागरीकांचे गहाळ झालेले मोबाईल याबाबत नागरीकांनी संबंधित पोलीस स्टेशनला तसेच पोर्टलवर तक्रार केल्यानंतर सायबर पोलीस स्टेशन येथून त्याची चौकशी करण्यात येते. असे एकूण ८६ मोबाईल हस्तगत केले होते. त्याची किंमत १३ लाख ८९ हजार ९३३ एवढी आहे.
सदर मोबाईल मुळ मालकाला परत करण्यात आले. त्याचबरोबर बोरी पोलीस ठाणे हद्दीतील फसवणूकीच्या प्रकरणात हस्तगत केलेले रोख साडे आठ लाख फिर्यादीला परत करण्यात आली. (Parbhani police) कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील झालेल्या घरफोडीच्या घटनेतील लाख रूपयाच्या किंमतीचे सोन्याचे डागीणे फिर्यादीला परत करण्यात आले. पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्याहस्ते मुद्देमाल देण्यात आला.