१ कोटी २५ लाख रूपयांच्या इस्टीमेट तयार करण्यावरच प्रश्नचिन्ह
सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता सोनवणे यांच्याकडे संशयाची सूई
सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता सोनवणे यांच्याकडे संशयाची सूई
यवतमाळ () : यवतमाळ सिंचन विभाग,यवतमाळकडून अधरपूस मध्यम प्रकल्प वक्रव्दाराच्या उर्ध्व बाजूस जमा झालेला जलपर्णीने सह इतर तरंगता मलबा काढण्यासाठी एप्रिल महिन्यात १ कोटी २५ लाख रूपयाचे काम निविदा मॅनेज करून एका हितसंबंधित कंत्राटदाराला दिले. काम जलपर्णी सह तरंगता मलबा काढण्यासाठीच्या (Jalparni Tendering) निविदाकरीता बजेटरी ऑफर ऑनलाईन करायला हवी होती.
मात्र निविदा मॅनेज करण्याचे मनसूबे पूर्वनियोजित असल्याने स्थानिक पातळीवर ऑफलाईन कोटेशन घेवून निविदा काढण्यात आली व त्यास मंजूरी देवून हितसंबंधित कंत्राटदारला काम देवून जलसंपदा विभागाचा १ कोटी २५ लाख रूपयांचा चुराडा करण्यात आला. यामध्ये यवतमाळ सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता योगेश सोनवणे यांचा व्यक्तिगत इंटरेस्ट आडवा येत असल्याचे एकूणच निविदा प्रक्रियेतील गोंधळावरून दिसून येत असल्याची चर्चा स्थानिकांमधून होत आहे.
यवतमाळ सिचंन मंडळाचे अधिक्षक अभियंता योगेश सोनवणे यांनी एप्रिल २०२५ मध्ये अधरपूस मध्यम प्रकल्प वक्रव्दाराच्या उर्ध्व बाजूस जमा झालेला जलपर्णीने व्यापलेला तरंगणारा मलबा काढण्यासाठी (Jalparni Tendering) ई निविदा काढल्या.या निविदेतील अॅटम नॉनडीएसआर स्वरुपाचे होते. त्यामुळे माननिय कार्यकारी संचालक विपाविम नागपूर यांच्या परिपत्रकानुसार दरसूची बाहेरील कोनत्याही बाबीसाठी जर रेट मागवायचे असतील तर त्या अॅटमची बजेटरी ऑफर डब्लु. डब्लु. डब्लु. डब्लुआरडी. एमएएचए. जीओव्ही.इन या संकेतस्थळावर ऑनलाईन टाकणे टाकणे बंधनकारक आहे.
याची पूर्ण जाणीव यवतमाळ सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता योगेश सोनवणे यांना असतानाही,त्यांनी त्यांच्या हितसंबंधितांच्या त्यांना आवश्यक वाटणार्या दराच्या ऑफलाईन कोटेशन घेवून निविदा काढल्या.यामध्ये जलपर्णी व इतर सर्व साहित्य जलाशयातून काढण्यासाठी ४५०.७५ स्क्वेअर मिटर चे दर निश्चित केले.तर जलपर्णीचा शोध घेण्यासाठी (डायर्व्हस) करीता ६० हजार ६५०.५० हे रेट दर दिवसाच्या कामांसाठी कुठल्या आधारावर निश्चित करण्यात आले,हे स्पष्ट होत नाही. जर बजेटरी ऑफर ऑनलाईन टाकल्या गेल्या असत्या,तर संबंधीत कामांसाठी राज्यातून विविध संस्थांकडून दर प्राप्त झाले असते,त्यातून निम्नतम दर निश्चित करून त्या आधारावर विपाविम नागपूर यांच्या परिपत्रकानुसार कामासाठी पारदर्शक इस्टीमेट अधिकृत ठरले असते. मात्र अधिक्षक अभियंता योगेश सोनवणे यांनी विपाविमच्या परिपत्रकाला डावलून नियमबाह्यरितीने निविदा काढण्याचा खटाटोप केल्याचे दिसून येत आहे.
दक्षता विभाग जलसंपदा विभाग नागपूर मार्फत चौकशी व्हावी
यवतमाळ सिंचन विभाग,यवतमाळ चे अधिक्षक अभियंता योगेश सोनवणे यांनी अधरपूस मध्यम प्रकल्पातील तरंगता मलबा काढण्याच्या कामाचे १ कोटी २५ लाख रूपयांचे इस्टीमेटच नियमबाह्यरितीने तयार केले आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया व त्याआधारावर झालेले व न झालेले काम हे नियमबाह्य असून त्यात प्रथमदर्शनी अधिक्षक अभियंता यांच्यावर संशयाची सुई ठेवण्याला जागा निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी ही दक्षता विभाग जलसंपदा विभाग,नागपूर यांच्या मार्फत करण्याची आवश्यकता आहे.