Jalgaon News:- सामनाच्या संपादकीयमध्ये “हिंदू तालिबान” हा शब्द वापरून हिंदू समाजाचा (Hindu society) अपमान करण्यात आला असून त्यामुळे हिंदू समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत आज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेचे उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडोमार आंदोलन केले त्यानंतर त्यांच्या प्रतिमांसह “सामना”च्या अंकाची होळी करण्यात आली.