नगरसेवकाचा हस्तक्षेप; इंजिनिअर ची चुप्पी, लाखोंचे नुकसान!
कोरची (Drainage Construction Scam) : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची नगरपंचायत (Korchi Nagar Panchayat) अंतर्गत दर्रोटोली परिसरात सुरू असलेल्या नालीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. सिमेंट,रेती,गिट्टीचे प्रमाण 1:2:4 असताना 1:3:5 असे प्रमाण वापरले जात असल्याचे मजुरांनी सदर प्रतिनिधी जवळ सांगितले. रेतीमध्ये मोठ्या प्रमाणात माती आहे, गिट्टी छत्तीसगड राज्यातील आहे,इस्टिमेट नुसार कोणतेच काम होताना दिसत नाही. नालीचे बेसमेंट मध्ये 80 एमएम 40 एम एम गिट्टी टाकून मजबूत करायला पाहिजे.परंतु प्रत्यक्षात हे काम पाहिजे त्या दर्जाचे झाले नाही. गिट्टी वापरण्यात आली नाही .यामुळे बेसमेंट कच्चा तयार झाला असून सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे नगरसेवकाच्या जवळच्या नातेवाईकांनी हे काम करीत असल्याचे निदर्शनात आले आहे. याबाबत इंजिनीयर नाकाडे यांच्याशी नालीची चौकशी केली असता जसे, ठेकेदार कोण आहेत? किती मीटर नालीचे बांधकाम होत आहे? किती रुपयाचे काम आहे? इस्टिमेट दाखवा असे प्रश्न केले असता त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. उलट वाद घालण्याचा प्रयत्न केला.
न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी!
दर्रोटोली परिसरात जुन्या नालीला नवीन नाली जोडण्याच्या उद्देशाने हे बांधकाम सुरू आहे.मात्र नवीन नाली जुन्या नालीपेक्षा दीड फूट उंच बांधत असल्याने पाण्याचा प्रवाह पूर्णपणे बिघडला आहे. हे कसे शक्य आहे? जुन्या नालीला जोडायचे काम करताना उंची वेगळी ठेवली तर पाणी कुठे जाईल? याचे साधे भान ठेवले नाही. हा स्पष्टपणे भ्रष्टाचार आहे. वरील कामे नगरसेवकाच्या नातेवाईकांनी हाती घेतल्यास निविदा प्रक्रिया, ठेकेदाराची निवड आणि पारदर्शकता याचा पूर्णपणे भंग होत आहे. यामुळे सार्वजनिक निधीचा उघडपणे गैरवापर होत असल्याचा आरोप होत आहे. या बांधकामाविषयी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री याकडे तक्रार करण्याची नागरिकांनी ठरवले आहे. या प्रकरणाने कोरची नगरपंचायत वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांनी (Citizens) आता न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे.