Kanhan :- शहरातील नागपुर जबलपुर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गौवंश नंदी गंभीर जख्मी झाल्याने गौ सेवा समिती कन्हान क्षेत्राच्या युवकांनी पुढाकार घेऊन तिला प्राणी रूग्णवाहिकेच्या (Ambulance) मदतीने उपचाराकामी जैन गौशाला काटोल रोड नागपुर येथे पाठविण्यात आले.
गौसेवा समिती कन्हान क्षेत्र यांचा सेवाभावी उपक्रम
शनिवार (दि.६) सप्टेंबर ला रात्री दरम्यान नागपुर जबलपुर महामार्गावर जे.एन हॉस्पिटल च्या समोर अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवुन गौवंश ला जोरदार धडक दिली. धडकेत गौवंश च्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती गौ सेवा समतीचे सदस्य वृषभ बावनकर यांना मिळताच त्यांनी शहर प्रमुख शुभम बावनकर यांना माहिती दिली. त्यांनी गौ सेवा समिती सदस्य वेदांत बावनकुळे यांना सोबत घेऊन जे. एन हॉस्पिटल जवळ जाऊन पाहणी केली असता त्यांना गौवंश नंदी गंभीर जख्मी अवस्थेत आढळुन आला. शुभम बावनकर यांनी पशु वैद्यकीय डॉक्टर(Medical doctor) उमेश कुमार रहांगडाले यांना दुरध्वनी द्वारे संर्पक केला. त्यांनी घटनास्थळावर पोहचुन योग्य उपचार केला. गौसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष साई कनोजिया यांनी जैन गौशाला येथे संपर्क केला असता.
रविवार ला जख्मी गौवंश नंदी ला प्राणी रूग्ण वाहिकेच्या मदतीने उपचाराकामी जैन गौशाला काटो ल रोड नागपुर येथे पाठविण्यात आले. याप्रसंगी सक ल हिंदु समाज कन्हान क्षेत्राचे अध्यक्ष आणि गौसेवा समिती कन्हान क्षेत्र प्रमुख शुभम बावनकर, उपप्रमुख हिमांशु सावरकर, सदस्य वेदांत बावनकुळे, आयुष संतापे, अरविंद कश्यप, निकस सिंग भैया, निखिल मधुमटके, अजय पाली, रितेश ठाकुर सह नागरिकानी उपस्थित राहुन सहकार्य केले.