या पंधरा दिवसात ५५ नागरिकांना बेवारस कुत्र्यांनी चावुन केले जख्मी
कन्हान (Kanhan Nagar Parishad) : नगरपरिषद अंतर्गत शहरात ऐन पावसाळ यात रस्त्यावर, चौकात मोकाट जनावरे आणि कुत्र्याचे मोठया प्रमाणात वाढ होऊन रस्त्यावर बसणा-या मोकाट जनावरामुळे वाहन चालकाचे अपघात होत असुन मोकाट कुत्र्यांचे झुंडचे झुंड फिरत असल्याने रस्त्याने चौकात व घरासामोर फिरणा-या लहान मुले, नागरिक आणि जेष्ट महिला पुरूष सकाळ, संध्याकाळ पायदळ फिरणा-याच्या अचानक मागुन येवुन कुत्रे चावुन गंभीर जख्मी करित असल्याने नागरिकात चांग लेच भितीचे वातावरण निर्माण झाल्याने नगरपरिषद प्रशासनाने वेळीच दखल घेऊन या मोकाट जनावरे आणि कुत्र्याचा योग्य बंदोहस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कन्हान नगरपरिषद (Kanhan Nagar Parishad) अंतर्गत मुख्य राष्ट्रीय महा मार्ग, गांधी चौक, आंबेडकर चौक, तारसा रोड चौक, तारसा रोड, दखने हायस्कुल रोड, पाधन रोड, गहुहिव रा रोड, आंबेडकर चौक ते पिपरी रोड, मच्छी, मटन मॉर्केट मार्गे पिपरी रोड, स्टेशन रोड, सत्रापुर, सिहोरा रोड आदी रस्त्यावर आणि चौकाचौकात मोकाट जना वरे आणि कुत्र्याचे मोठया प्रमाणात वाढ होऊन रस्त्या वर बसणा-या मोकाट जनावरामुळे सायकल, दुचाकी वाहन चालकाचे अपघात होत असुन मोकाट कुत्र्यांचे झुंडचे झुंड फिरत असल्याने रस्त्याने, चौकात व घरा सामोर फिरणा-या लहान मुले, नागरिक आणि जेष्ट महिला, पुरूष सकाळ, संध्याकाळ पायदळ फिरणा-याना अचानक मागुन येवुन कुत्रे चावुन गंभीर जख्मी करित असल्याने या पंधरा दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्रात ५५ पेक्षा जास्त नागरिकांना डॉग बाईट चे इंजे क्शन लावण्यात आले आहे.
या एका वर्षात आता पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रातुन ६१९ लोकांना डॉग बाईटचे इंजेक्शन लावण्यात आले. (Kanhan Nagar Parishad) तसेच जनावरा मुळे होणा-या अपघाताचे सुध्दा प्रमाण वाढल्याने आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन कन्हान व्दारे नगरपरिषद प्रशासनाला यावर योग्य उपाय योजना करण्याचे सुच विले आहे. जवळच असलेल्या नगरपंचायत कांद्री येथे मंगळवार (दि.२९) जुलै २०२५ ला रात्री रमेश मस्के यांच्या शेळ्यांच्या (बक-याच्या) कोठयात बेवारस कुत्र्याच्या झुंडानी हल्ला करून पाच बक-याना जिवा निशी ठार मारून काहीना जख्मी केले होते.
कन्हान येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार आणि नागरिकांनी (Kanhan Nagar Parishad) नगरपरिषद कन्हान-पिपपी ला निवेदन देऊन मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा तात्काळ योग बंदोब स्त करून नागरिकांना होणा-या त्रासापासुन मुक्त कर ण्याची मागणी केली आहे. तरी सुध्दा उपाययोजना होत नसल्याने प्रशासन लहान मुले, जेष्ट नागरिक, महिला, पुरूषाचा मोठा अपघात होऊन जिवितहानी होण्याची वाट बघत आहे का ? अशा प्रश्न उपस्थित करून या मोकाट जनावरांचा व कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकात जोर धरू लागली आहे.