रक्तदान शिबिरात विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग
अमरावती (Kargil Vijay Day) : दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती द्वारा स्मृतीशेष दादासाहेब गवई (Dadasaheb Gawai) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तसेच कारगिल विजय दिवसानिमित्य आयोजित रक्तदान शिबिरात विद्यार्थ्यांसह अनेकांनी सहभाग घेतला. तक्षशिला महाविद्यालय याठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दि. १३ जुलै ते २६ जुलै दरम्यान दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सामाजिक सामाजिक पंधरवाडयाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वृक्षारोपण, कृषी मार्गदर्शन ल,रक्तदान शिबिर असे विविध समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. आज दिनांक २६ जुलै ला स्मृतीशेष दादासाहेब गवई (Dadasaheb Gawai) यांचा स्मृतीदिन व कारगिल विजय दिवसाचे (Kargil Vijay Day) औचित्य साधून तक्षशिला महाविद्यालय श्याम नगर, अमरावती येथे भव्य रक्तदान शिबीर (Blood donation camp) आयोजित करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आईसाहेब डॉ. कमलताई गवई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून किर्ती अर्जुन यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नंदा राठोड अकोला, ज्येष्ठ समाजसेवक गोविंद कासट प्रा. नरेशचंद्र काठोळे (संचालक आय.ए.एस. अकॅडमी अमरावती) आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कमलताई गवई यांनी याप्रसंगी समाजासाठी केलेले विशेष कार्य ज्या दिवशी माझ्या हातुन घडते तोच माझा जन्मदिवस मी समजते असे म्हटले. रक्तदान शिबीर हे मानवतेला जिवंत ठेवणारा उपक्रम आहे असे त्यांनी प्रतिपादीत केले. किर्ती अर्जुन यांनी कारगोल येथे शहीद झालेल्या सर्व विरांना (Kargil Vijay Day) कारगील विजय दिनानिमित्त श्रध्दांजली अर्पित केली. श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रा.पी.आर.एस. राव यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले.
याप्रसंगी श्री. दादासाहेब गवई (Dadasaheb Gawai) चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रा.पी.आर.एस. राव, प्रशासकीय अधिकारी प्रा. सचिन म. पंडीत, डॉ. बाबासाहेब आबेंडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर पायस, तक्षशिला महाविद्यालय दारापुरचे प्राचार्य डॉ. मल्लु पडवाल, डॉ. कमलताई गवई इंजिनिइरिंग कॉलजचे प्राचार्य डॉ. एस.टी. वरघट तक्षशिला पॉलिटेक्निकचे प्राचार्य शैलेश शेकापुरे, रामकृष्ण शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा माकोडे, कमलप्रकाश फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. व्ही. मनवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबीरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू यांनी रक्तसंकलन केले. या (Blood donation camp) शिबिराचे यशस्वी नियोजन प्रा. प्रीतेश पाटील, डॉ. प्रवीण वानखडे, डॉ. नवल पाटील, प्रा. सचिन कुमरे, डॉ. प्रशांत खेडकर, डॉ. अनिल भगत, डॉ. सुनिलकुमार, डॉ. ओ.एस. बोबडे, डॉ. दिनेश धाकडे, प्रा. चेतन जंवजाळ, प्रा. निहाल मेंदुल, डॉ. अनिल नागदेवते, डॉ. रजनी भाकरे, डॉ. संतोष यावले. डॉ. पंकज चौधरी यांनी केले.वरील सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व नागरीकांनी रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.




