कोरची (Kodagul Health Malaria) : कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एडजाल या गावातील एका चार वर्षीय चिमुकलीचा (Malaria Death) मृत्यू मलेरियाने झाला आहे. यापुर्वी कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्रापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या गोडरी येथील चार वर्षीय प्रमोद अनिल नैताम आणि त्याची सहा वर्षीय बहीण करिश्मा अनिल नैताम यांचा 10 मार्च रोजी मलेरिया ने मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच याच (Kodagul Health Centre) प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत आलोंडी येथील आरती कुंजाम या दिड महिन्याच्या चिमुकलीचा मलेरिया ने मृत्यू झाला होता.
या मृत्यूची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद मडावी यांना चांगलेच फैलावर घेऊन ताकीद दिली होती. परंतू आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांच्यात तिळमात्र सुधारणा केल्याचे दिसून येत नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्रात १ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत १०४ मलेरिया पीव्ही २९ पीएफ ७५ मलेरिया रुग्ण (Malaria Death) आढळले असून एका चार वर्षे बालिकेचा यात (Malaria Death) मलेरियाने मृत्यू झाला आहे. शिवांगी कैलास नेताम 4 वर्षे राहणार एडजाल असे मृत्यू पावलेल्या बालिकेचे नाव आहे. ऐडजाल हे गाव प्राथमिक आरोग्य कोडगूड पासून हे गाव फक्त सहा किमी अंतरावर आहे.
कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्राला (Kodagul Health Centre) पूर्णवेळ प्राथमिक आरोग्य अधिकारी नसल्याने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे अतिरिक्त प्रभात देण्यात आलेला आहे. पण हे तालुका वैद्यकीय अधिकारी महिन्याला एक व्हीजिट देत असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये ओरड असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेले नवखे डॉक्टर मलेरियाचे प्रकोप असलेल्या डुगडुगी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विचार करण्यास असमर्थ असल्याचे दिसून येते
प्रस्तुत प्रतिनिधीने आज (Kodagul Health Centre) कोडगूल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर काजल नाकाडे यांना भ्रमणध्वनी वरून एक जुलै ते सहा ऑगस्टपर्यंत किती मलेरियाचे रुग्ण आहेत याची माहिती मागितली असता त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती देण्यास नकार दिले असल्याचे सांगितले त्यामुळे आरोग्य विभाग आदिवासीच्या उपचार करतो की आदिवासींची मरण लपवितो अशी चर्चा सुरू झालेली आहे