कोरची (Korachi Health Center) : इथून 25 किमी अंतरावर असलेल्या कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Korachi Health Center) डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला, असे कोटगुल येथील गुलाब टेंभुर्णे यांनी आरोप केला आहे. आज पहाटेच्या 4 वाजताच्या दरम्यान वंश गुलाब टेंभुर्णे वय 6 वर्षे याची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथील डॉ. काजल नाकाडे यांनी प्राथमिक उपचार करुन मुलाला गडचिरोली च्या सामान्य रुग्णालयात रेफर केले.
दवाखान्यात चार गाड्या असताना तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी फक्त मलेरिया आणि गरोदर मातांनाच दवाखान्याची गाडी द्यायची असे म्हटले आहे. त्यामुळे मी तुम्हांला गाडी देऊ शकत नाही असे म्हटले. त्यानंतर मुलाचे वडील गुलाब टेंभुर्णे हे खाजगी गाडी शोधण्यासाठी गावात गेले. गाडी शोधायला त्याला उशीर झाला. खाजगी गाडीने गडचिरोली ला जात असताना वाटेतच मुलाचा मृत्यू झाला.
दवाखान्याची गाडी जर वेळीच उपलब्ध झाली असली तर बाळ दगावला नसता. गाडी लोकांसाठी आहे. त्यामुळे गाडी न देणाऱ्या डॉ. काजल नाकाडे आणि गाडी देऊ नका असे आदेश देणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुलाचे प्रेत उचलणार नाही. असा पवित्रा घेत संपूर्ण गावकरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या टाकला.
सकाळी 9 वाजेपासून दुपारी 3 .30 वाजेपर्यंत शवाची विल्हेवाट लावली नाही. गडचिरोली इथून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे बिडीओ राजेश फाये,डॉ पेंदाम डॉ गोरे डॉ विनोद मडावी पोलीस अधिकारी साळुंके आणि ईतर अधिकारी मोक्यावर आले आणि चौकशी करून दोषी असलेल्या (Korachi Health Center) डॉक्टरांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्रा (Korachi Health Center) अंतर्गत गेल्या चार महिन्यांपासून मलेरियाने पाच बालके आरोग्य विभागा गलथान कारभारामुळे दगावली आहेत हे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी मान्य केल्याने आंदोलकांनी मृत्यू कुटुंबातील शासनाने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी रेटून धरली होती यावर आमचा कडे अशी मदत देण्यासाठी तशी तरतूद नाही त्यामुळे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून प्रयत्न करु असे सांगितले. त्यानंतर शवाची विल्हेवाट नातेवाईकांनी केली.
सोबतच त्याठिकाणी पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. चौधरी यांची नियुक्ती केली. (Korachi Health Center) पुन्हा डॉक्टर पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे लोकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, आनंद चौबे देवराव गजभीये, प्रमेश्वर लोंहबरे,मातलाम,भारतसाय कुजाम,अनिल जाभुळकर,विनोद कोरेटी शालीखकराम कराडे कोडगुल परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.