शिवसेना( उबाठा) जिल्हा प्रमुख वासुदेव शेळमाके यांनी तात्काळ कामे सुरु करा अन्यता आंदोलन
कोरची (Korchi Road) : कोरची तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे मागील कित्येक दिवसापासून या रस्त्याची अशीच अवस्था असून त्याकडे संबंधित विभागाचे व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. याचा नाहक त्रास मात्र नागरिकांना होत आहे. कोरची तालुक्यातील काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर काही रस्ते जिल्हा परिषद बांधकाम गावाकडे आहे .
यातील मुख्य रस्ता असलेले (Korchi Road) कोरची येथील बस स्टॉप ते तहसील कार्यालयाकडे जाणार रस्ता हे जिल्हा परिषद बांधकाम कडे आहे . त्या रस्त्यावर असल्यामुळे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. काही अपघात झाले आहे. कोरची ते बोटेकसा,रस्ता मध्ये खड्डे पडले आहेत. बेतकाठी ते अल्लीटोला रस्ता मोठेमोठे खड्डे पडले आहेत. गीट्टी बाहेर निघाली आहे. रस्ता अखेरीचा घटक मोजत आहे. या (Korchi Road) रस्त्यावर मार्गक्रम करणे कठीण बनले आहे. बेतकाठी ते अल्लीटोला वरून आले जाणार रस्ता हा फुटलेला आहे . पंतप्रधान सडक योजनेच्या रस्त्याची दैनावस्था असुन या रस्त्याने वाहन चालवीणे किवा पायदळ चालणे कठिण होऊन .कोसमी नं.2 ते भटगांव आणि कोसमी ,नांगपुर ते भटगांव, तसेच बोटेझरी या अवस्था असून या रस्त्याच्या वाहन चालवणे किंवा पायदळ चालणे कठीण होऊन बसले आहे.
तसेच नाडेकर ते कोटगूल यासारख्या खेड्याकडे जाणारा अत्यंत रस्ते जागोजागी खड्डे पटलेले असून याकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी कमालीच्या दुरुस्त होत आहे. या (Korchi Road) रस्त्याकडे जास्त आजपर्यंत कोणताही पदाधिकारी तथा अधिकारी लक्ष देत नसल्यास या रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे या रस्त्याच्या कामाकडे त्वरित लक्ष देऊन या रस्त्याचे काम करण्यात यावा अशी मागणी वासुदेव शेंडमाकेशिवसेना (उबाठा ) जिल्हा प्रमुख गडचिरोली , राजुभाऊ अंबानी आरमोरी जिल्हा संघटक गडचिरोली, राजेद्र लांजेवार गडचिरोली ,नरेश देशमुख तालुका प्रमुख कोरची,सदाशीव गहाणे तालुका उपप्रमुख कोरची गुरूदेव मेश्राम शहर प्रमुख कोरची, रस्तयाचे कामे तात्काळ सुरू करा अन्यता आदोलन करू असा ईसारा पत्रकात दिले आहे.