Vairagad :- येथे अनेक वर्षापासून बिबट्याची दहशत असून बिबट लोक वस्तीत येऊन पाळीव प्राण्यांना (Pets) जखमी आणि ठार करीत असल्याच्या घटना यापुर्वीही घडल्या असतांना दोन दिवसापुर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन गर्भवती बकर्या बिबट्याने ठार केल्याने शेळी पालन करणार्या शेतकर्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
दि. ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री जुना बस स्थानक जवळ येऊन बिबट्याने कुंभार मोहल्ल्यातील बाळा रामा बोदेले यांच्या गर्भवती (pregnant)असलेल्या दोन बकर्या घरातून आरक बोडी जवळ झुडुपात नेऊन ठार केल्या. चार ते पाच दिवसात दोनही बकर्या प्रसूती होणार होत्या.
वन विभागा मार्फत कॅमेरे लावण्यात आले
या घटनेमुळे शेळी पालन करणारा शेतकरी (Farmer)मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. याबाबत बाळा बोदेले यांनी वैरागड वन विभागात तक्रार केली असता वैरागड वन विभागाचे वन क्षेत्र सहाय्यक राजू बेहरे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक के. के. बिस्वास व वन मजूर मुन्ना मानकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वैरागड जंगल परिसरात अनेक वर्षापासून एकच बिबट (Leopard)असून तो लोकवस्तीत येत आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी गांधी चौक परिसर आणि बसस्थानक (bus station)जवळील परिसरात वन विभागा (Forest Department) मार्फत कॅमेरे लावण्यात आले आहेत.लवकरच वन विभाग बिबट्याचा बंदोबस्त करेल असे वैरागड वन विभागाचे वनरक्षक बिस्वास यांनी सांगितले.