परभणी (Parbhani):- विना परवानगी मुख्यालय सोडल्यामुळे महापालिका आयुक्तांनी सहाय्यक आयुक्त बबन तडवी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर अचानक सहाय्यक आयुक्तांचा रक्तदाब वाढून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील(District General Hospital) आयसीयुत दाखल करण्यात आले. हा प्रकार मंगळवार २३ जुलै रोजी घडला.
आयुक्तांचा रक्तदाब वाढल्याची चर्चा
शहर महापालिकेत १ जुलै रोजी बबन तडवी हे सहाय्यक आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यांना प्रभाग समिती क व मनपातील इतर विभागांचा पदभार देण्यात आला आहे. सद्यस्थितीत मनपात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना (Laadki Bahin Yojana)राबविण्यात येत आहे.
या योजनेचे काम प्रभावीपणे होण्यासाठी शहरात प्रभाग समिती निहाय सहाय्यता केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. शनिवार, रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आयुक्तांच्या पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय न सोडण्याबाबत सर्व अधिकारी, कर्मचार्यांना कळविण्यात आले होते. मात्र सहाय्यक आयुक्त बबन तडवी हे २० ते २२ जुलै या दरम्यान मुख्यालयात नव्हते. ते गैरहजर असल्याने विना वेतन का करण्यात येऊ नये, या बाबत महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने (signature) २३ जुलै रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मंगळवारी दुपारी चारच्या नंतर अचानक सहाय्यक आयुक्त तडवी यांची प्रकृती खालावली. रक्तदाब वाढल्याने त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात(government hospital) दाखल करण्यात आले. आयुक्तांच्या नोटीस नंतर सहाय्यक आयुक्तांचा रक्तदाब(blood pressure) वाढल्याची चर्चा ऐकावयास येत आहे.