चाकूर भूमि अभिलेख कार्यालयातील प्रकरण: तिघांवर कारवाई होणार!
चाकूर (Land Records Office) : चाकूर तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्यावर चाकूर पोलिसांत शुक्रवारी (दि. 4) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील भूमिअभिलेख कार्यालयात डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Demokratir Annabhau Sathe) यांच्या प्रतिमेची विटंबना झालेली होती. असा गैरप्रकार होऊन महापुरुषांच्या अवमान झाल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या. भूमीअभिलेख कार्यालयातील कर्मचारी विनायक टेकाराम राठोड यांचा टेबल असून त्यांच्याच भूमीअभिलेख कार्यालयातील दक्षिणेकडील खिडकीला 19 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजता डॉ.आण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा उलटी (दोरीने बांधून) करून सर्व मातंग समाजाच्या धार्मिक श्रध्दांचा अपमान करून ते अपवित्र केले आहे. त्याप्रकरणी नितीन रावसाहेब डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्मचारी विनायक टेकाराम राठोड यांच्याविरुद्ध चाकूर पोलिसांत (Chakur Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. टी. चव्हाण करीत आहेत.
शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित!
या प्रकरणात भूमिअभिलेख कार्यालयाच्या (Land Records Office) उपअधिक्षक गवई यांनी कार्यालयातील प्रभारी मुख्यालय सहाय्यक, भूमापक आणि शिपाई यांना कारणे दाखवा नोटीस आणि दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी यापूर्वी वरिष्ठांना 25 जून रोजी पत्राद्वारे प्रस्तावित केले आहे.