अंबादास दानवे विधानपरिषदेतल्या राड्यानंतर माघार घेण्यास तयार नाही
मुंबई (Legislature Monsoon Sessions) : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Legislature Monsoon Sessions) प्रामुख्याने विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने येत आहेत. सोमवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हिंदू विरोधी वक्तव्यावरून चांगलीच बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. विधान परिषदेचे (Legislative Council) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave ) यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे.
यासंदर्भात प्रसाद लाड यांनी अंबादास दानवे (Ambadas Danave ) यांनी सभागृहाची माफी मागावी, तसेच राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यावर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत भाजपाने कायदे किंवा नियम शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांत प्रत्त्युत्तर दिले आहे. तसेच आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) बाहेर भेटले असते तर काय केले असते? असा प्रश्न अंबादास दानवे यांना पत्रकारांनी विचारला असता, प्रसाद दिला असता, असे उत्तर त्यांनी दिले.
विधान परिषदेत झालेल्या गोंधळानंतर आता सभागृहात कसे सामोरे जाणारे? या प्रश्नावर बोलताना अंबादास दानवे (Ambadas Danave ) म्हणाले की, “आम्ही सभागृहात जाऊ. त्यात काय घाबरायचे? त्यांना निलंबन करायचे असेल तर करून टाका, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी घेतली.