कसारी मेंढा फाट्याजवळील घटना
कुरखेडा (Leopard Attack) : कुरखेडा – देसाईगंज मार्गावरील मेंढा (कसारी) फाट्याजवळ बिबट्याने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दूचाकी वरील पती -पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज २५ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सूमारास घडली. (Leopard Attack) अपघातात कृषी उत्पन्न बाजार समीती उपबाजार कुरखेडा येथे लिपीक असलेले धनंजय हरीभाऊ कूथे (५२) व पत्नी धनश्री धनंजय कूथे (४५) रा.श्रीरामनगर कुरखेडा हे गंभीर जखमी झाले आहेत.
ते दोघे पती – पत्नी नातेवाईकाच्या लग्नाकरीता आपल्या दुचाकीने कुरखेडा – देसाईगंज मार्गे मांढळ ता.लाखांदूर कडे जात असताना अचानक त्यांचा दूचाकी समोर बिबट आला व (Leopard Attack) बिबट्याने दुचाकीला धडक दिल्याने पती- पत्नी रस्त्यावर पडले. यावेळी धनंजय कूथे यांनी हेल्मेट घातला असल्याने डोके वाचले. मात्र हेलमेट पूर्ण मोडत हाता पायाला गंभीर दूखापत झाली तर पत्नी सूद्धा गंभीर जखमी झाली.
यावेळी रस्त्यावरून जाणार्यांनी रूग्णवाहीकेस फोन लावला. मात्र रूग्णवाहीका पोहचण्यात उशीर होत असल्याने यावेळी या (Leopard Attack) मार्गाने कुरखेडाकडे कारने येणारे शिक्षक दांम्पत्य गिरीधर फूलबांधे व सूनिता फूलबांधे यांना हा अपघात निदर्शनास येताच त्यांनी आपल्या वाहनात दोन्ही जखमींना मांडत उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा येथे आणले.
येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. (Leopard Attack) घटनेची माहिती मिळताच भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये व नगरसेवक सागर निरंकारी यांनी रूग्णालयाला भेट देत जखमींना मदत करीत दिलासा दिला. मात्र प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही जखमींना ब्रम्हपुरी येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले.