पवनी तालुक्यातील खांबाडी शेतशिवारातील घटना
अड्याळ (Lightning Death) : यावर्षी मे महिन्यात जिल्ह्यात विजेचे तांडव कायम आहे. मागील काही दिवसांपासून मेघगर्जना व विजेच्या कडकडाटसह उन्ह-सावलीचा खेळ सुरु आहे. हवामान विभागाकडून वीज कोसळण्याची (Lightning Death) शक्यता वर्तविली जात आहे. हवामान खात्याचा अंदाजही खरा ठरत आहे. दि.२७ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान अचानक मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाट होऊन काही भागात अवकाळी पाऊस कोसळला. तर पवनी तालुक्यातील खांबाडी शेतशिवारात धान कापणी करीत असलेल्या हार्वेस्टर मशीनवर वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले.
मृतांमध्ये कांता रमेश जिभकाटे (५५) रा.पिंपळगाव (निपाणी) ह.मु. चिचाळ, विजयी सिंग (४०) रा.मथुरा (उत्तरप्रदेश), अशी नावे असून जखमींमध्ये संजय नामदेव गाडेकर (४७) रा.पिंपळगाव (निपाणी) व महेश तेजासिंग (३०) रा.मथुरा (उत्तरप्रदेश), अशी जखमींची नावे असून जखमींवर ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे.
सध्या पवनी तालुक्यात व इतरही भागात उन्हाळी धान कापणीसह मळणीचे काम धडाक्यात सुरु आहे. (Lightning Death) अवकाळीच्या सावटात शेतकरी हार्वेस्टरने कापणी करीत आहे. धान कापणीकरीता परप्रांतातून हार्वेस्टर दाखल झाले आहेत. मृतक कांता जिभकाटे या महिला शेतकर्याच्या शेतात दि.२७ मे रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान हार्वेस्टर मशीनने धान कापणी करीत असतांना अचानक वीज कोसळली. त्यात शेतमालक कांता जिभकाटे व हार्वेस्टरवरील विजय सिंग याचा जागीच मृत्यू झाला. तर संजय गाडेकर व हार्वेस्टरवरील महेश तेजासिंग जखमी झाले.
घटना उघडकीस येताच आजूबाजूच्या शेतातील शेतकर्यांनी घटनास्थळी धाव घेऊन याची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. अड्याळचे ठाणेदार धनंजय पाटील यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून जखमींना ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे उपचारार्थ दाखल केले. घटनेचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, ठाणेदार धनंजय पाटील तसेच महसूल कर्मचार्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जाते. या (Lightning Death) घटनेमुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मे महिन्यात तिघांसह बारा जनावरे मृत
दरवर्षी मे महिना तापमानाने हिट ठरत असतो. मात्र यावषीa अवकाळी पावसाने थैमान घातल्याने मे महिन्यात हिवाळ्याचा गारवा अनुभवास मिळत आहे. तापमानात प्रचंड घट आल्याने प्रखर उष्णतेच्या मे महिन्यात जणू काही पावसाळाच असल्याचा भास होत आहे. यावर्षी (Lightning Death) जिल्ह्यात विजेचा तांडव कायम आहे. या महिन्यात आतापर्यंत वीज कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला. तर बारा जनावरे मृत्यूमुखी पडले.
तसेच वादळी पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील अठरा घरांसह गोठ्यांची पडझड झाली. मागील महिन्यात देखील जिल्ह्यात (Lightning Death) वीज कोसळल्याच्या घटना उघडकीस आले आहेत. एकंदरीत यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात विजेचा तांडव कायम असल्याने अनेक लोकांना तसेच पाळीव जनावरांना प्राणास मुकावे लागले आहे. वारंवार वीज कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांसह शेतकरी पशुपालकांमध्ये धडकी भरली आहे.