Gadchiroli :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान (weather) पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र १५ ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान १८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने (Department of Meteorology) व्यक्त केली आहे. यामुळे पुन्हा अवकाळीचे संकट घोंघावणार असल्याने शेतकर्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वार्यापासून सुरक्षित ठेवावे
सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भात असू शकते. या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. शेतकर्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वार्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून (Department of Agriculture) करण्यात आले आहे.